वसई: विरारच्या विवा महाविद्यालयाच्या ५ व्या मजल्यावरून पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुमित सरोज असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली.विरार पश्चिमेला विवा महाविद्यालय आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास या महाविद्यालयात बारावीत शिकणारा सुमित सरोज (१८) हा विद्यार्थी पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुमित हा १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या त्यांची प्रात्याक्षिक परीक्षा सुरू होती. मात्र त्याने दोन पेपर्स दिले नव्हते. त्याची प्रात्यक्षिक परीक्षा जुन्या महाविद्यालयात होती मग तो नवीन इमारतीत गेला होता. नव्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार फुटांची संरक्षक भिंत आहे. त्यामुळे कुणी उडी मारल्याशिवाय खाली पडू शकत नाही, असे महाविद्यालयाचे विश्वस्त संजीव पाटील यांनी सांगितले.या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली की तो खाली पडला याचा आम्ही तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student dies after falling from 5th floor of viva college virar vasai amy
First published on: 09-02-2024 at 23:05 IST