वसई : नायगाव येथे एका खासगी शाळेच्या बसने धडक दिल्याने दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्ये समोर आली आहेत.

नायगाव पश्चिमेच्या अमोल नगर परिसरात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला. याच परिसरात राहणाऱ्या २ आणि ६ वर्षांच्या दोन सख्या बहिणी पायी जात असताना शाळेच्या बसने धडक दिली. दोन्ही बहिणी बसच्या चाकाखाली आल्या. स्थानिकांनी या मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बस चालकानेही या कामात मदत केली. या पैकी लहान मुलगी अतिदक्षता रुग्णालयात उपचार घेत आहेत. आद्यप गुन्हा दाखल झाला नसल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two little sisters injured in school bus accident in vasai amy
First published on: 02-03-2024 at 00:31 IST