अडगुलं मडगुलं, सोन्याचं क डगुलं, रु प्याचा वाळा, तान्ह्य़ा बाळा, तीट लावा, अशा बालगाण्यांतून लहान मुलांच्या दागिन्यांचे सहज उल्लेख येतात, ते त्यांना खेळवताना. प्रत्यक्षात त्यांचा संबंध थेट सोन्याशी येतो तो, जिवती पूजन नि बारशाच्या दिवशी. बाळाच्या नि आपल्या जीवनातल्या सोनेरी क्षणांचे साथीदार होतात, ते हे सोन्याचे दागिने. परंपरा जपण्यासाठी नि हौसेनं केलेले या लहान मुलांच्या सोन्याच्या दागिन्यांची दुनिया कोही औरच आहे. जिवतीच्या प्रतिमेपासून ते नजर क वचापर्यंत हे दागिने कि तीतरी नावीन्यपूर्ण रू पात पाहायला मिळतात. क धी पारंपरिक , क धी रेडीमेड तर क धी खास ऑर्डरचे.. बारीक तार नि मोत्यांचे मणी, मनगटय़ा, वळं, अंगठी, आमले, रिंगा, कोनातले,
बांगडय़ा, पाटल्या, ब्रेसलेट, कडं, चेन, गोफ , साखळी, क मरपट्टा, तोरडय़ा वगैरे.. कोय घ्यावं नि कि ती घ्यावं.. बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी जिवतीची पूजा के ली जाते.
जिवतीचा हा ताईत गळ्यात किंवा हातात बांधला जातो. ही जिवतीची प्रतिमा गोल किंवा बदामाच्या आकोराच्या पेंडण्टमध्ये असते. त्यानंतर शक्यतो बाराव्या किंवा तेराव्या दिवशी बाळाचे कोन टोचले जातात. कोन टोचल्यावर घातलेली तार व्यवस्थित वळवली तर बाळाला ती लागत नाही. बारशाच्या वेळी दिलं जाणारं बाळलेणं हे कोही वेळा पारंपरिक म्हणजे आजोबा-पणजोबांपासून वंशपरंपरेनं आलेलं असतं. ते बाळाला दिलं जातं. उदाहरणार्थ गळ्यातली छोटी चेन, त्यात बदामाच्या आकोराचं लॉके ट, मुलाला क डी के ली जाते. मुलीला नाजूक पाटल्या-बांगडय़ाही करतात.
हे सगळे दागिने घडवताना त्यांच्या कडा लागणार नाहीत, याची कोळजी घेतली जाते. कोरण बाळाची त्वचा फोरच नाजूक असते. कोही वेळा दागिना सोन्याचा असला तरी त्याची रिअॅक्शन येऊ शक ते. क्वचित जुन्या दागिन्यांमध्ये हवेमुळे रासायनिक प्रक्रि या घडून त्वचेला अपाय होऊ शक तो. ते टोचूही शक तात. तज्ज्ञ सांगतात की, आपल्याक डच्या पद्धतीनुसार साडेतीन मुहूर्त निगुरु पुष्य मिळून वर्षांला आठ-दहा वेळा सोनं घ्यावं. सोन्यातली गुंतवणूक ही खूप फोयदेशीर ठरते. सोन्याला रिसेल व्हॅल्यू आहे. हल्ली नॅनोचं जग दागिन्यांतही आलंय. लोकोंना कमी वजनाचे पण चांगले दिसणारे सुबक दागिने हवे असतात. मग हौसेनं ऑर्डर देऊ न सोन्याच्या तोरडय़ा, सोन्याचे वाळे, क मरेची सोन्याची साखळी क.रून घेतात. मनगटांमध्ये कोळे- सोन्याचे मणी क मी-जास्त किंवा त्यांचा आकोर क मीजास्ता केला जातो. बारशाला वळं नि अंगठी घेतलं जातं. शाळेत जाणाऱ्या मुलींना फि क्स कोनातले घातले जातात. कोही वेळा शाळेच्या सांगण्यानुसार ते कोढावेही लागतात.
लहान मुलांसाठी दागिने खरेदी करताना किंवा त्यांना भेट देताना आताशा पालक नि नातलग फार कोळजी घेतात. त्याबद्दल हेमाली पिंगळे सांगते की, सोहम नि प्रथमला पाचव्या दिवशी परंपरेनुसार जिवतीपूजन करून जिवतीची प्रतिमा घातली होती. जिवतीची प्रतिमा टोचू नये, याची कोळजी घेतली होती.
बाराव्या दिवशी त्यांचे कोन टोचले होते. कोन टोचल्यावर त्या तारेत मणी-मोतीही घातले जातात. पण अनेकदा ते कपडे घालताना अडक तात. त्यामुळे मी ते घालणं टाळलं नि फक्त तार घालून ती टोचणार नाही, अशी फिक्स करून घेतली. परंपरेनुसार आजीनं त्याच्या बाबांची चेन-पेंडण्ट सोहमला दिली. प्रथमसाठी नवीन चेन केली. बारशाला दोघांनाही भेट म्हणून चेन, वळी मिळाली होती. सणावाराच्या निमित्तानं त्यांना चेन घालते. एरवी सुरक्षेच्या कोरणानं बाहेर चेन घालत नाही. सोहमची शाळा नि दोघांच्या बेबी सिटिंगच्या सूचनेनुसार दागिने घालता येत नाहीत. तर स्वप्ना महाजनच्या म्हणते, ‘‘मिहिकोला बारशाच्या वेळी दोन्ही आजोळक डून नि नातलगांक डून भेट म्हणून दागिने मिळालेत. तिच्या बांगडय़ा अॅडजस्टेबल असल्यानं थोडी मोठी झाल्यावरही घालता येतील. तिची चेन नि अंगठीही नंतर घालता येऊ शके ल. चेन प्लेन नि डिझाइनची आहे. डिझाइन तिला बोचू नये, असं बघून घेतलं होतं. कोन बाराव्या दिवशी टोचले असल्यानं ते फि क्स आहेत.
कोनातल्यांचा नाजूक डिझाइनचा आणखी एक जोड आहे. महिन्याचा वाढदिवस नि सणावाराला एखादा दागिना तिला घालते. बारशाच्या वेळी पणती म्हणून तिच्यावर सोन्याची फु लं उधळण्याऐवजी तिला घालण्याजोगी चेनच के ली. सुरक्षेच्या दृष्टीनं तिला घरीच दागिने घालते.’’
हल्ली एक -दोन मुलं असल्यानं त्यांच्यासाठी शक्य ते सगळं के लं जातं. शिवाय सगळ्यांच्या हौसेला मोल नसतं नि एको परीनं ती चांगली गुंतवणूक होते, असं अनेक दा म्हटलं जातं. पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन नि मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ गाडगीळ यांच्या मते, ‘‘सोन्याचे दागिने हा भारतीय संस्कृ तीत एक अविभाज्य भाग मानला जातो, मग ते दागिने म्हणून के लेले असोत किंवा एक गुंतवणूक म्हणून त्याक डे पाहिलं जात असो. वैशिष्टय़पूर्ण नि वेगळ्या बाजाचे युनिक म्हणावेत, असे दागिने घडवण्यावर आमचा कोयमच भर असतो. लहान मुलांसाठीच्या दागिन्यांचा ट्रेण्ड सध्या वाढताना दिसतोय. छोटीशी अंगठी किंवा अनेक पदरी नजर क वच सध्या लोक प्रिय आहे.
मुलांच्या हितासाठी म्हणून गणपती किंवा हनुमानाची प्रतिमा असणारी पेंडण्टही अनेक पालक घेतात.’’ तर ज्योती राठोड संगानी म्हणते की, ‘‘ग्रितीला षष्ठीपूजा अर्थात छटीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे क पडे घालून सोन्याच्या अंगठीनं मध चाटवला होता. तिच्या बारशाच्या दिवशी आमच्याक डे बऱ्याच कोळाने मुलीचा जन्म झाल्याने कोनातले, चेन, ब्रेसलेट, बांगडय़ा, क डं, अंगठी, क डदोरा असे खूप दागिने तिला मिळाले. हे दागिने तिला सणावारापुरतेच घालते. यंदा जन्माष्टमीला तिला कृ ष्णरू प दिलं होतं नि सगळे दागिने घातले होते. तिच्या वर्षांच्या वाढदिवसाची थीम परी असल्याने फ क्त चेनच घातली होती. पाचव्या महिन्यात तिचे कोन टोचले नि कोळ्या मण्यांसह सोन्याची तार घातली. तिच्या बांगडय़ा प्लेन असून क मरपट्टय़ाला लॉक आहे. परंपरा पाळतानाच त्यांची वर्तमानाशी सांगड घालण्यावर मी भर देते.’’ तर गौरी भावे जोशी सांगते की, ‘‘मल्हारला दोन्ही आजोळक डून बारशाला बरेच दागिने मिळालेत. सोन्याची चेन नि सोन्याच्या गणपतीचं लॉकेट दिलंय. हातातली २ क डी नि अंगठी असून बरीच वळी भेट आल्येत. वर्षभर फिक्स बाळी होत्या. त्याचा पॅटर्न भिक बाळ्यांसारखा होता. आता सणावाराला त्याला चेन, क डी घालते. मात्र सुरक्षेच्या कोरणामुळे एरवी आणि शाळेत कोणतेही
दागिने घालत नाही.’’
जाणकोर सांगतात की, सध्याची महागाई लोकोंच्या सोने खरेदीवर परिणाम क रतेय. बारशाच्या वेळी द्यायला चेन नाही, पण एक ग्रॅमची अंगठी किंवा मग वळं घेतलं जातं. सध्या नाजूक डिझाइनच्या दागिन्यांना अधिक पसंती दिली जाते. तर ज्योती क दमच्या मते, रिद्धिमाला बारशाच्या वेळी कोनातले, चेन, मनगटय़ा भेट आल्यात. दसरा-दिवाळी असे मोठे सणवार असताना घरीच कि ंवा अगदी जवळच्या लग्नकोर्यात तिला हे दागिने मी घालते. सुरक्षेच्या विचारानं आणि शाळेनं तशी सूचना दिल्यामुळे तिला एरवी दागिने घालतच नाही. प्रभवलाही क डं, साखळी नि कोनात बाळी आहे. त्यालाही ते घरीच घालते. एके कोळी सोनं हौस म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून घेतलं जायचं, ते प्रमाण तितकं सं राहिलेलं नाही. तर धनश्री भागवत दीक्षित सांगते की, सोहमला सोन्याचे दागिने फोरसे केले नाहीत. जिवती पूजन क रू न घातलेली जिवतीची प्रतिमा त्याच्या गळ्यात असते. बारशाला त्याला दोन्ही आजोळक डून चेन मिळाल्यात. अंगठी मिळालेय. कोन टोचल्यावर बाळी फि क्स होती ती आता कोढून टाक ली, कोरण तो शाळेत जायला लागलाय. सणावारी कोही घालायचं ठरवलं, तरी त्याला ते नको असतं. घातलं तरी तो ते कोढून टाकोयला लावतो. भेट म्हणून आलेल्या वळ्यांचे दागिने क रण्यापेक्षा ती पुढं त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील, असा प्रॅक्टिक ल विचार आम्ही के लाय.
आपली संस्कृ ती, परंपरा नि शुभाशुभ संके तांचं जग, पालकोंची हौस नि ट्रेण्ड फॉलो क रायची वृत्ती, वाढती क्र यशक्ती आणि व्यावहारिक विचारांची कोस धरणं, मुलांचं आरोग्य नि सुरक्षेचा प्रश्न असे कि तीही मुद्दे चर्चिले गेले तरी आपल्या लाडक्या ‘सोनू’साठी सोन्याचे दागिने घेणं किंवा त्याला भेट देणं, हे चक्र तूर्तास तरी चालूच राहणार..
राधिको कुंटे

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…