अफजल गुरू हा सुशिक्षित होता. त्याने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली होती. संसद हल्ल्यात अटक झाली तेव्हा तो कमिशन एजंट म्हणून काम करीत होता. उत्तर काश्मीरमधील सोपोर या गावचा तो मूळ रहिवासी होता. त्याचे वडील हबिबउल्ला हे वाहतूक व लाकूड व्यवसायात होते. तो तरूण असतानाच ते वारले. अफजल गुरूची इच्छा डॉक्टर होण्याची होती. त्याने १९८८ मध्ये झेलम व्हॅली मेडिकल कॉलेजात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता पण त्याचे एमबीबीएस पूर्ण होऊ शकले नाही. दिल्लीत गुरू हा त्याचा चुलतभाऊ शौकत गुरू याच्या समवेत राहत होता. शौकतचा विवाह अफसान नवज्योत या शीख मुलीशी झाला होता. तिने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. गुरू याचा शेवटचा व्यवसाय हा फळांचा होता. १३ डिसेंबर २००१ रोजीच्या संसद हल्ल्यानंतर त्याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्याची पत्नी तबस्सुम हिने राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. ती सध्या काश्मीरमध्ये तिचा मुलगा गालिब याच्यासह राहते. गुरू याने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये सहभाग घेतला होता. जे अफजलला ओळखत होते त्यांच्यामते तो चांगला शिकलेला होता व त्याला अवांतर गोष्टीतही रस होता. सर्वोच्च न्यायालयाने गुरूची फाशीची शिक्षा उचलून धरली होती. ४ ऑगस्ट २००५ रोजीच्या २७१ पानी निकालपत्रात न्या. पी.व्ही.रेड्डी व न्या. पी.पी.नेवलेकर यांनी असे म्हटले होते की, संसदेत हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी अफजल गुरूचा संबंध होता, याचे निíववाद पुरावे आहेत.

संसदेवर हल्ला करण्यासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट का झाला नाही, हा प्रश्न अफझल गुरूला अखेपर्यंत भेडसावत होता, असे तिहार कारागृहाच्या अधीक्षकांनी आपल्या १८० पानांच्या हस्तलिखितामध्ये म्हटले आहे.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
jnu never anti national or part of tukde tukde gang says university vc shantishree pandit
 ‘जेएनयू’ कधीही तुकडे-तुकडे टोळीचा भाग नव्हते!