|| तेजश्री गायकवाड

रंगांच्या यादीमध्ये नवं वर्ष राखाडी आणि पिवळा असे दोन  रंग गाजवणार असल्याचं ‘पॅन्टोन’ कंपनीने नुकतंच जाहीर केलं. अर्थात हा फक्त इतर रंगांप्रमाणे ट्रेण्डमध्ये येणारा एखादा रंग नाही. तर या रंगाच्या निमित्ताने नवं वर्ष नव्या प्रयोगांचं असेल, या विचारावरही शिक्कामोर्तब झालं आहे.

Rahul Gandhi Wayanad Lok Sabha constituency human animal conflict LDF BJP
राहुल गांधींपेक्षा हत्तींनी जास्त भेटी दिल्या; वायनाड मतदारसंघामधल्या मतदारांची खंत
Lok Sabha elections Assam
चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?
BJP invited global parties
“भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 

दरवर्षी डिझायनर आणि ट्रेण्ड फॉरकास्टर्स ‘पॅन्टोन’ कंपनीकडून जाहीर के ल्या जाणाऱ्या वर्षाच्या नव्या रंगाची आतुरतेने वाट पाहत असतात. या कंपनीद्वारे जाहीर झालेला रंग ग्लोबली फक्त फॅशनच नाही तर प्रत्येक गोष्टींमध्ये  फॉलो केला जातो. २०  वर्षांहून अधिक काळ ‘पॅन्टोन’ कंपनीकडून जाहीर होणाऱ्या नव्या वर्षाच्या नव्या रंगाने फॅशन, होम फर्निशिंग्ज आणि औद्योगिक डिझाईन तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग आणि ग्राफिक डिझाइनसह अनेक उद्योगांमध्ये उत्पादन विकास आणि खरेदीच्या निर्णयावर प्रभाव टाकला आहे. ‘पॅन्टोन कलर ऑफ द इअर’ निवड प्रक्रियेसाठी विचारपूर्वक  आणि लोकांचा कल काय आहे याचे विश्लेषण-अभ्यास  करून रंगाची निवड होते. दरवर्षी नव्या रंगाची निवड करताना ‘पॅन्टोन कलर इन्स्टिट्यूट’मधील रंगतज्ज्ञ जगावर नवीन कोणत्या रंगाचा प्रभाव पडेल हे आवर्जून बघतात.  निवड प्रक्रियेत मनोरंजन इंडस्ट्री, ट्रॅव्हल आर्ट कलेक्शन, फॅशन डिझाइनमधील सर्व क्षेत्रे, लोकप्रिय प्रवासाची ठिकाणे तसेच नवीन जीवनशैली, प्ले स्टाईल आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास समाविष्ट असतो . तसेच  नविन तंत्रज्ञान, साहित्य, पोत आणि रंग यावर परिणाम करणारे  संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील लक्ष वेधून घेणारे आगामी खेळाचे कार्यक्रमही लक्षात घेतले जातात. यंदा राखाडी आणि पिवळा अशा  एक नाही तर दोन रंगांची निवड करण्यात आली आहे. एवढ्या वर्षात अशी दुसरीच वेळ आहे जेव्हा एका वर्षासाठी दोन रंगांची निवड केली गेली आहे.

पॅन्टोनने निवडलेले राखाडी आणि पिवळा हे दोन्ही रंग जरी वेगवेगळे, स्वतंत्र  असले तरी एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही रंग  ऐक्य आणि परस्पर समर्थनाची संकल्पना दर्शवतात. पिवळा रंग तेजस्वी आणि जिवंतपणा दर्शवतो तर राखाडी रंग विश्वाासार्हता आणि खंबीरता दर्शवते. तसेच हे रंग म्हणजे  शक्ती, आशावाद आणि धैर्याचे प्रतीक आहेत. निव्वळ फॅशनच नाही तर  आर्किटेक्चरमध्येही चंचलता आणि सामथ्र्य यांची सांगड घालणारे पॅलेट म्हणून हे रंग ओळखले जाणार आहेत. सामाजिक स्थाने, घरगुती मोकळी जागा, महत्त्वाच्या  जागा अशा ठिकाणी  अधिक समानता  आणि सकारात्मकतेची संकल्पना आणण्यासाठी हे पॅलेट नक्कीच वापरले जाणार आहे. पॅन्टोन कंपनी रंग निवडताना वर्षभराच्या घडामोडी, घटना यांचा अभ्यास करून रंगाच्या माध्यमातून दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या समाजाचं सूचक प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे या रंगाकडे फक्त रंग म्हणून दुर्लक्षित करण्याऐवजी याची दखल घेणं महत्त्वाचं आहे. २०२० हे वर्ष करोनामुळे तसं उदासीन गेलं. ना कुठलं सेलिब्रेशन ना कुठले सण साजरे करणं झालं. या उदासीनतेला बाजूला सारण्यासाठी पिवळ्या रंगाची निवड आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी राखाडी रंगाची निवड केली गेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

या रंगांचा फॅशन इंडस्ट्रीवर खूप मोठा प्रभाव पडतो. यंदाच्या स्प्रिंग समर कलेक्शनमध्ये आवर्जून या रंगांचा वापर केला जाणार आहे. फॅशनमध्ये हे रंग निव्वळ कपड्यांपुरते न राहता अगदी फुटवेअर, ज्वेलरी, आयवेअर, टोप्या, बेल्ट, बॅग्ज अशा असंख्य गोष्टींसाठी वापरले जाणार आहेत. हे रंग स्वतंत्रपणे वापरण्यापेक्षा एकत्र वापरण्यावर डिझायनर्सचा भर असणार आहे. त्यामुळे बाजारात या रंगाचे कॉम्बिनेशनवाले कपडे आणि अन्य अ‍ॅक्सेसरीज घ्यायला विसरू नका. फॅशनप्रमाणेच तुमची रूम सजवताही या रंगाच्या गोष्टी नक्की सामील करा. गेल्या वर्षी राहिलेल्या सगळ्या पार्टीची वसुली यंदाच्या वर्षी करायचं अनेकांचं नियोजन असेल. हे नियोजन करतानाही ‘कलर ऑफ द इअर’ नक्कीच लक्षात ठेवा आणि तुमच्या सेलिब्रेशनमध्ये या रंगांचा वापर करा.

viva@expressindia.com