श्रीगोंदे तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्रीगोंदे साखर कारखान्याचे संचालक धनसिंग भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी सांगितले.
पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर भोईटे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ससाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. मात्र चौकशी करता भोसले यांना ज्येष्ठ नेते, कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्यावर केलेली टीका भोवली असल्याचे सांगितले जाते. कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात भोसले यांनी नागवडे यांच्यावर टीका केली होती, तसेच नंतर झालेल्या काही ग्रामपंचायत निवडणुकींत पक्षविरोधी काम केले होते. नागवडे यांचे परंपरागत विरोधक माजी पालकमंत्री आ. बबनराव पाचपुते यांच्याशी भोसले यांची जवळीक वाढली होती. तशा तक्रारी ठाकरे यांच्याकडे श्रीगोंदे तालुक्यातून करण्यात आल्या होत्या.
भोईटे सांगवीचे माजी सरपंच व सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, नागवडे, कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र नागवडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Normal
0

MicrosoftInternetExplorer4

काँग्रेसच्या श्रीगोंदे

तालुकाध्यक्षपदी भोईटे

प्रतिनिधी, नगर

/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:”Times New Roman”;}