श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाच्या अधोगतीला व गैरकारभाराला डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक िशदे यांचे प्रशासन सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्या विरोधात सामान्य जनतेबरोबरच तेथील कर्मचाऱ्यांनी संघर्ष सुरु केला आहे.
रुग्णालयातील बी ब्लॉक इमारतीसमोर तेथील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अधिष्ठाता डॉ. िशदे यांच्याविरोधात ‘चले जाव’ च्या घोषणा देत निदर्शने केली. डॉ. िशदे हे गेल्या सात वर्षांपासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत. मोठय़ा प्रमाणात असूनही केवळ राजकीय पाठबळ आणि ’अर्थ’ पूर्ण व्यवहाराच्या जोरावर डॉ. िशदे यांना हलविले जात नाही, असे सामान्यजनात व रुग्णालय कर्मचारीवर्गात बोलले जाते. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नस्रेस फेडरेशन सोलापूर शाखा व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने अधिष्ठाता डॉ. िशदे यांच्या विरोधात निदर्शने केली. नस्रेस फेडरेशनच्या अध्यक्षा रुथ कलबंडी, सचिवा स्मिता जोशी व उपाध्यक्ष पांडुरंग बाबर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे शंकर जाधव, अशोक इंदापूरे, छाया भोसले, शंतनु गायकवाड, सटवाजी होटकर, गौतम इंगळे, राहुल सूतकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.