औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिला पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलातील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रोजी विधान परिषदेत जाहीर केले.
राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे तेजस्विनीचा सत्कार करण्यात आला. या वेळी तेजस्विनीने बालेवाडीतील असुविधांकडे आमदार सतीश चव्हाण यांचे लक्ष वेधले. घरच्या जेमतेम आर्थिक स्थितीमुळे तिला करावा लागणारा खर्च मोठा होता. त्यामुळे आगामी ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करणाऱ्या तेजस्विनीला बालेवाडीतील क्रीडासंकुलात आमदार चव्हाण यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सरावासाठी सोयीचे होणार आहे. बालेवाडी क्रीडासंकुलातील नि:शुल्क व्यवस्था व नि:शुल्क सराव उपलब्ध झाल्यास आगामी काळात चांगला सराव करून अजून चांगली कामगिरी तेजस्विनीकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.