विदर्भ साहित्य संघाच्या येत्या वर्धापनदिनी प्रदान करण्यात येणाऱ्या आणखी चार पुरस्कारांची घोषणा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी नुकतीच केली.
विदर्भ संघातर्फे प्रदान करण्यात येणारा नाना जोग स्मृती नाटय़लेखन पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांच्या ‘विदूषक’ या नाटकास घोषित करण्यात आला आहे, तर यंदाच्या हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी प्रशांत कोरटकर ठरले आहेत. विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेले वाङ्मयीन नियतकालिक ‘युगवाणी’ यामधील सवरेत्कृष्ट लेखासाठी असलेला पां.ब. गाडगीळ स्मृती पुरस्कार यंदा डॉ. माणिक कानेड यांच्या ‘वसंत आबाजी डहाके व नाटक’ या लेखास मिळाला आहे. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकातील सवरेत्कृष्ट कथेसाठी के.ज. पुरोहित (शांताराम) यांनी पुरस्कृत केलेला शांताराम कथा पुरस्कार इरावती कर्णिक यांच्या ‘मुक्तशब्द’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘पापाचा घडा’ या कथेस घोषित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचा यंदा ९० वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी वर्धापन दिन १४ जानेवारीला होतो, परंतु चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमुळे हा समारंभ रविवारी, २० जानेवारी २०१३ ला आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात सर्व वाङ्मय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.    

nagpur matin bhosale marathi news, nagpur fasepardhi marathi news
फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा