शहरातील कल्याणी नमकिन या खाकरा बनविणाऱ्या कारखान्यातून इंण्डेन गॅस कंपनीच्या १२७ टाक्या शिरूर तहसील कार्यालयाने शुक्रवारी जप्त केल्या. संबंधित कारखान्याच्या मालक मनीषा कल्पेश दुगड यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी दिली. पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी निनावी तक्रार आली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने शहरातील लाटेआळी भागात असणाऱ्या कल्याणी नमकिन या कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी तळमजल्यावर पन्नास रिकाम्या गॅस टाक्यांबरोबरच व्यावसायिक वापराच्या ६१ टाक्या व आठ घरगुती वापराच्या गॅसच्या टाक्या मिळाल्या, अशा या ठिकाणी १२७ टाक्या मिळून आल्या. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.