अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘द प्रोफेशनल एक्सलेंट अवॉर्ड’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी डॉ. प्रकाश आमटे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन लक्ष्मण गंधे आणि मुंबईमधील न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यावेळी उपस्थित राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसामध्ये लोक बिरादरी नावाचा प्रकल्प चालवून त्या ठिकाणी दरवर्षी ४० हजारच्यावर रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय जखमी पशुपक्षीवर उपचार केले जाते. लोकबिरादरी आश्रमशाळेत सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.