शहरातील विद्यार्थ्यांना एका क्लिकवर विविध माहिती उपलब्ध होते. इतकेच नव्हे तर त्यांना विविध ग्रंथालयेही उपलब्ध असतात. पण ग्रामीण भागांतील विद्यार्थी आजही यापासून दूर आहेत. या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी ज्ञानाचे भांडार खुले करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने विद्यावाहिनी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी झाले. यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची अचूक माहिती पोहाचणार असल्याचा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.
विद्यापीठाने साकारलेल्या ही विद्यावाहिनी विद्यापीठाच्या क्षेत्रातील जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागांत प्रवास करणार आहे. याचा लाभ केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्रत्येक नागरिकाला घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, शैक्षणिक साहित्य, माहितीचे स्रोत या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत. याशिवाय वेळोवेळी विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानेही होणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली. ही विद्यावाहिनी प्रत्येक ठिकाणी दहा दिवस मुक्काम करणार असून या दहा दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत. यात प्रश्नमंजुषा, पुस्तक देणगी, पुस्तक वाचन स्पर्धा, पुस्तक अनुवाद स्पर्धा, सर्वोत्तम प्रकल्प स्पर्धाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यावाहिनीमध्ये काय आहे?
पाच संगणक
एलसीडी प्रोजेक्टर
१६० इंचांची प्लाझ्मा स्क्रीन
वाय-फाय जोडणी
जीपीएस प्रणाली
ई-बुक्स, जर्नल्स
ऑडिओ बुक्स
डिजिटल एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका
साहित्य आणि विविध विषयांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तके
विविध विषयांचे माहितीपट

Big decision of UGC Ban on admission to open and distance courses
युजीसीचा मोठा निर्णय… मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशबंदी…
jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत