आपल्या चित्रांमधून स्त्रियांची विविध रूपे व त्यांचे भाव टिपणाऱ्या अव्वल महिला  चित्रकारांपैकी एक म्हणजे अंजोली इला मेनन. त्यांना नुकताच राष्ट्रीय कालिदास सन्मान मध्य प्रदेश सरकारने प्रदान केला आहे. दृश्य कलेत स्त्रीजीवनाची विविध रूपे मांडण्याच्या मेनन यांच्या कर्तृत्वाचा खास उल्लेख पुरस्कार समितीने केला आहे. भारतातील अतिशय संवेदनशील व सिद्धहस्त कलाकारांपैकी त्या एक. सन १९५८ मध्ये त्यांचे एकल चित्र प्रदर्शन दिल्लीत झाले होते तेव्हापासून आतापर्यंत त्यांची कलाकीर्द अव्याहत सुरू आहे. विविध साधनांनी मेनन यांनी स्त्री प्रतिमा रेखाटल्या. मॅसोनाइटवर तैलरंगाने चित्रे रंगविणे, ही त्यांची खास पद्धत. जलरंगांतही त्यांनी काम केले आहे. इटलीच्या मुरानो बेटावर जाऊन त्यांनी काच-कलाकृती घडवल्या. मुंबई विमानतळाच्या ‘टर्मिनल टू’वरील सर्वात मोठय़ा भित्तिशिल्पासह, अनेक भित्तिशिल्पे (म्यूरल) त्यांनी घडविली आहेत. त्यांना इस. २००० मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आले होते.

बंगालमध्ये (आताचा पश्चिम बंगाल) १९४० साली त्यांचा जन्म झाला. तामिळनाडूतील निलगिरी हिल्सच्या लॉरेन्स स्कूलमध्ये त्या शिकल्या. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी जे.जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या मुंबईतील उपयोजित कलासंस्थेचा रस्ता पकडला. नंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. त्याच काळात त्या मोदिग्लियानीसारखा इटालियन चित्रकार तसेच अमृता शेरगिल यांच्या चित्रशैलीने- तसेच एम. एफ. हुसेन यांच्या शैलीने प्रभावित झाल्या. वेगवेगळ्या शैलींतील ५३ चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन त्यांनी केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे अठरा. नंतर फ्रेंच शिष्यवृत्तीवर त्यांना पॅरिसमधील इकोल द ब्यू आर्ट्स या संस्थेत कला शिकण्याची संधी मिळाली. पॅरिस, अल्जियर्स, साओ पावलो येथील द्वैवार्षिक महाप्रदर्शनांत (बिएनाले) त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. नवी दिल्लीत २००५ पर्यंत भरणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ललितकला अकादमी- आंतरराष्ट्रीय त्रवार्षिकी’त तर त्यांनी तीनदा कला सादर केली. १९८८ मध्ये ‘फोर डीकेड्स’ हे सिंहावलोकन स्वरूपाचे त्यांचे चित्र प्रदर्शन मुंबईत झाले होते. १९९२ मध्ये त्यांचे एक चित्र प्रदर्शन झाले त्यात त्यांनी खुर्च्या, पेटय़ा, कपाटे यांवर चित्रे रेखाटली होती. चित्रकलेतील नियमांची चौकट मोडून त्यांनी एका वेगळ्या पातळीवर ती नेण्याचा प्रयत्न केला. १९९६ मध्ये त्यांनी त्यांच्याच प्रसिद्ध चित्रांमधील प्रतिमा संगणकावर घेऊन अ‍ॅक्रिलिक व तैलरंगात ती सजवली. दिल्लीतील मेनोनजायटिस-थ्री जनरेशन्स ऑफ आर्ट (२००८), गॉड्स अँड अदर्स (२०००), यात्रा (२००६) ही त्यांची चित्र प्रदर्शने गाजली.

pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…
jobs
नोकरीची संधी
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया