असे म्हणतात ना की, एखादी गोष्ट मनापासून करण्याची जर इच्छाशक्ती असेल, तर व्यक्ती काहीही करून सर्व अडथळ्यांवर मात करीत ती गोष्ट करून दाखवते. त्यात विशेषत: स्त्रियांना कुटुंब आणि काम अशा दोन्ही गोष्टी सांभाळून आपली स्वप्ने पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते. पण, ‘कोरल वूमन’ उमा मणी यांनी कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळून अशी एक जबाबदारी खांद्यावर घेतली; जी अनेकांसाठी फार प्रेरणादायी आहे.

उमा मणी यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती; पण त्या काळी उमा यांच्या आजी-आजोबांना चित्र काढणे म्हणजे कागद आणि रंगीत पेन्सिलचा अनावश्यक वापर करणे, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी तिला चित्रकलेची आवड जोपासण्यास विरोध केला. यावेळी त्यांना फक्त अभ्यास आणि लग्न या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. पण, वयाच्या ४९ व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितरीत्या पार पाडल्या आणि पोहणे व डायव्हिंग शिकण्याचा संकल्प केला. यावेळी ‘तुझे हे वय आजी होण्याचे आहे’ असे नातेवाइकांचे अनेक टोमणे त्यांना सहन करावे लागले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diver artist uma mani began exploring new depths to life at age 49 chdc sjr
First published on: 01-04-2024 at 17:00 IST