साडी हा खरं तर प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. ‘माझ्याकडे नेसायला चांगली साडीच नाहीये,’ असं एवढंसं तोंड करून, हिरमुसून म्हणणाऱ्या कुठल्याही स्त्रीचं कपाट उघडलं, तर परीटघडीच्या, नीटनेटक्या ठेवलेल्या साड्यांची भली मोठी चळत डोळे वटारून पाहताना दिसेल! प्रत्येक साडीची स्वत:ची वेगळी आठवण असते, वेगळं महत्त्व असतं. त्यामुळे साड्या जुन्या झाल्या तरी सोडवत नाहीत. आठवणींची गाठोडी या साड्यांमध्ये बांधलेली असतात. याच साड्यांमध्ये एक चळत वेगवेगळ्या समारंभांत मिळालेल्या ‘मानाच्या’, आहेराच्या साड्यांचीही असते. या साड्या काही आपण स्वत: निवडलेल्या नसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा रंग, पोत आपल्या पसंतीचाच असेल असं नसतं. परिणामी पुष्कळदा या साड्या पडूनच राहतात. अगदी नव्याकोऱ्या. त्यातल्या खूपशा एकदाही नेसल्या जात नाहीत. पण याच आहेरी साड्या गरीब, गरजू स्त्रियांसाठी गेल्या काही वर्षांत ‘साडी बँक’च्या संकल्पनेच्या रूपात सोयीच्या ठरत आहेत.

विविध ठिकाणी ही संकल्पना स्त्रियांनी राबवली आहे. त्यातल्याच एक छत्रपती संभाजीनगरमधील मुक्त पत्रकार डॉ. आरतीश्यामल जोशी. त्यांनी गरीब, कष्टकरी स्त्रियांसाठी साडी बँक सुरू केली आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीला नवीकोरी साडी नेसण्याची हौस असतेच. ती पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणून ही संकल्पना उपयुक्त ठरते आहे.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका

हेही वाचा… दिवाळीच्या आनंदात ‘मी’ कुठे?…

अनेक कष्टकरी स्त्रियांसाठी नवीकोरी साडी हे दिवास्वप्नच असतं. घरातल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच स्त्रिया आपल्या साडीचा विचार करतात. त्यांचं हे नव्या साडीचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून, कार्यक्रमांतून नवी, मात्र न वापरलेली साडी, कधी आहेरात तर कधी विकत घेऊनही बाजूला पडलेली साडी दान करण्याचं आवाहन करण्यात येतं. रस्त्याच्या कामावर, बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या स्त्रिया, मातीत काम करणाऱ्या, कचरा वेचक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार स्त्रियांसाठी हा उपक्रम आहे. यातल्या काही स्त्रिया नवी साडी सहज कशी मिळतेय, याबद्दल साशंक असतात. पण काही आर्वजून आपल्या घरातल्या अन्य स्त्रियांसाठी साड्या मागून घेतात, हा आजवरचा अनुभव असल्याचं जोशी सांगतात. राखीपौर्णिमा, गुढीपाडवा, दिवाळी, भाऊबीज, आंबेडकर जयंती, बुध्दपौर्णिमा अशा विशिष्ट प्रसंगी गरीब वस्त्यांमध्ये जाऊन या साड्यांचं वाटप केलं जातं. आलेल्या साड्या आणि दिलेल्या साड्यांची नोंद करण्यात येते. त्यांच्यामार्फत हा उपक्रम सध्या नाशिक, पुणे आणि पालघरमध्ये सुरू आहे. सण आणि उत्सवांबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्येही साडी बँक महत्त्वाची भूमिका निभावते. आतापर्यंत त्यांनी ५८,३०० साड्या वितरित करण्यात आल्या आहेत.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवारासह आस्था जनविकास संस्थेचे सहकारी यासाठी काम करत आहेत. समाजमाध्यमांतून आवाहन केल्यानंतर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गरजू स्त्रियांशी अनौपचारिक गप्पा मारल्यानंतर त्यांना साडीची गरज आहे की नाही हे जाणून घेतलं जातं आणि ‘तुम्हाला नवी साडी दिली तर चालेल का?’ अशी विचारणा केली जाते. होकार मिळताच हातात आलेली नवी साडी पाहून अनेकींच्या डोळ्यांत पाणी येतं. काही स्त्रिया तर साडी वितरण करणाऱ्याच्या हातावर साखरही ठेवतात, तर काही चहाला थांबायचा आग्रह करतात. या स्त्रिया भरभरून बोलतातही. ‘आम्हाला भरजरी साडी नकोय. साधीच हवी. पण आमच्याकडे पैसे नाहीत,’ असं अनेक स्त्रिया मोकळेपणानं सांगतात. सहावारीबरोबरच काही नऊवारी साड्याही देण्यात येतात. जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या उपक्रमाचा अनुभव चांगला आहे.

खरं तर ही संकल्पना कुठेही राबवता येण्याजोगी आहे. दिवाळीच्या निमित्तानं अनेकजण काहीतरी विधायक कार्याची सुरूवात करू इच्छितात. त्यांनाही ‘साडी बँक’ ही संकल्पना त्यांच्या ठिकाणीही राबवता येऊ शकेल!

lokwomen.online@gmail.com