यंदाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन हा महिलाकेंद्रित असणार आहे. या दिनानिमित्त भारतीय वायूदलाच्या परेडमध्ये एकूण ४८ अग्निवीर महिला सहभागी होणार आहेत. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारतीय वायू सेनेच्या मार्चिंग तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर रश्मी ठाकूर करणार असून, स्क्वॉड्रन लीडर सुमिता यादव, स्क्वॉड्रन लीडर प्रतिती अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल या महिला अधिकारीदेखील यात सहभागी होतील.

याव्यतिरिक्त, भारतीय वायूसेनेच्या १५ महिला पायलट फ्लायपास्ट दरम्यान IAF च्या विविध विमानांचे संचालन करतील. यावर्षी, प्रजासत्ताक दिनाची IAF ची थीम ‘भारतीय वायू सेना : सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर’ अशी आहे.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताचं लष्करी सामर्थ्य पाहायला मिळणार आहे. यामध्ये लढाऊ विमाने, आठ वाहतूक विमाने, १३ हेलिकॉप्टर आणि एक हेरिटेज विमान कर्तव्यपथावरून आकाशात झेपावेल. फ्लायपास्टचे मुख्य आकर्षण म्हणजे वायूदलाच्या ताफ्यात नुकतेच समाविष्ट केलेले C-295 वाहतूक विमान. हे विमान प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.

स्वदेशी विकसित लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजसदेखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पदार्पण करणार आहे. परेडमधील ‘तेजस फॉर्मेशन’मध्ये चार जेट विमाने उड्डाण करतील. याशिवाय, यंदाच्या परेडमध्ये सहा राफेल लढाऊ विमानेही ‘वजरांग फॉर्मेशन’मध्ये उड्डाण करणार आहेत.

हे ही वाचा >> पक्ष कधी काढणार? कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? प्रशांत किशोर यांच्या राजकारणातील एंट्रीची योजना तयार

युद्धनौकेची कमान महिला अधिकाऱ्याकडे

भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी महिला सैनिकांसाठी त्यांचे सर्व दरवाजे उघडले आहेत. वायूदलाने अलीकडेच महिलांना फायटर पायलट म्हणून परवानगी दिली आहे. तर नौदलाने पहिल्यांदाच त्यांच्या एका युद्धनौकेची कमान महिला अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. भारतीय लष्करानेही सर्व दलांमध्ये आणि सेवांमध्ये महिला सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सामावून घेतलं आहे.