संपदा सोवनी

फोडणी करताना हिंग वा हळद करपणं :

Voting through EVM still delay in counting
नागपूर : ईव्हीएमद्वारे मतदान, तरीही मोजणीला विलंब होणार?
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकात फोडणी करताना फोडणीत घटक पदार्थ घालण्याची एक विशिष्ट ‘ऑर्डर’ असते. ती पाळली नाही, तर साधी फोडणीसुद्धा बिघडू शकते. म्हणजे, फोडणीचं तेल तापल्यावर त्यात सर्वप्रथम मोहरीच घालायला हवी. ती तडतडल्यानंतर तुम्ही जिरं वापरणार असाल तर जिरं घालावं. नंतर हिंग आणि सर्वांत शेवटी हळद! फोडणीत हळद घातली, की ती पक्की झाली, असं पूर्वीच्या बायका म्हणत. नव्यानं स्वयंपाक करताना पुष्कळदा ही ‘ऑर्डर’ चुकते, त्यामुळे मोहरी तेलात नीट न फुटून त्याला कडवट चव राहते. किंवा जर फोडणीचं तेल खूप तापलं, तर मोहरी, जिरं तर करपतंच, पण हिंग व हळद अगदी एका क्षणात करपून काळी होते. अशी फोडणी त्या पदार्थाला करपल्याचा गंध देते. हे टाळायचं असेल, तर फोडणीचं तेल खूप जास्त तापणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी फोडणी करताना साधारणपणे गोडेतेल- उदा. शेंगदाणा, करडई तेल किंवा रीफाईंड असेल तर ते वापरतात. हे तेल धूर निघेपर्यंत गरम करावं लागत नाही. तेल मध्यम तापल्यावर मोहरी टाकावी व ती तडतडू द्यावी. असं करताना हळूहळू तुम्हाला तेलाच्या तापण्याचा चांगला अंदाज येईल.

आता यातली टिप पाहू या… तेलात हिंग व हळद करपणं टाळण्यासाठी फोडणीत हिंग घालण्यापूर्वीच, ती फोडणी वापरून आपल्याला जी भाजी करायचीय त्याच्या ३-४ फोडी घाल्याव्यात. तुम्ही आमटी करत असलात तर अर्धा चमचा शिजलेली डाळ किंवा पोहे-उपमा वगैरे करत असलात, तर ४-५ शेंगदाणे वा चमचाभर चिरलेला कांदा किंवा चिरलेली मिरची हिंग-हळद घालण्यापूर्वीच फोडणीच घालावी. यात होतं असं, की दुसरा पदार्थ फोडणीत समाविष्ट केल्यानं तेलाचं तापमान झटकन कमी होतं आणि त्यानंतर घातलेला हिंग किंवा हळद अजिबात जळत नाही.

हेही वाचा… स्वयंपाकघरातले जिन्नस टिकवायचेत? मग वाचा या ५ टिप्स!

कोशिंबीर करून ठेवल्यावर त्याला पाणी सुटणे…

आपण काकडी, टोमॅटो, गाजर किंवा अशाच विविध कोशिंबिरी करतो. या कोशिंबिरी लिंबू पिळलेल्या (म्हणजे बिनदह्याच्या) असोत, वा दही घातलेल्या. जेवायला बसेपर्यंत मध्ये थोडा वेळ जातो आणि त्याला पाणी सुटतंच. कोशिंबीर ऑफिसच्या डब्यात न्यायची असेल, तर दुपारी डबा उघडेपर्यंत त्याला हमखास पाणी सुटलेलं असतं. अशा कोशिंबिरीची चवही जरा बदलते.

हे टाळण्यासाठी एक टिप आहे. कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला जी भाजी वापरायची आहे- उदा, ‘खमंग काकडी’साठी चोचवलेली काकडी किंवा चिरलेला टोमॅटो, किसलेलं गाजर वा बीट, ते घेऊन त्यावर आपल्या आवडीप्रमाणे फोडणी आणि तिखट, मीठ, साखर एवढंच आधी घालून ठेवावं. अगदी जेवायला बसताना त्यात थोडंसं खमंग असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं. तुम्हाला कोशिंबीरीत दही घालायचं असेल, तरी तेही अगदी जेवतानाच दाण्याच्या कुटाबरोबरच घालावं. दाण्याचं कूट कोशिंबिरीला सुटलेलं पाणी शोषतं आणि खमंग चव देतं. त्यामुळे ती जेवताना ‘फ्रेश’ लागेल.

हेही वाचा… चेहऱ्याच्या मसाजसाठीचा ‘जेड रोलर’ असतो तरी काय?

तुम्ही जेवणाचा डबा नेताना केवळ किसलेलं गाजर वा चिरलेला कांदा-टोमॅटो एका डब्यात नेऊन त्यावर वरून फोडणी ओतून तो डबा नेऊ शकता. दाण्याचं कूट, दही, मीठ-साखर वेगळ्या डब्यात नेऊन ते आयत्या वेळी, जेवताना घातलं, तर कोशिंबीर निश्चितपणे अधिक चांगली लागेल. हल्ली जेवणाच्या डब्यांमध्ये अनेक कप्पे असलेले डबे वापरण्याचा ‘ट्रेंड’ आहे. त्या लहान-लहान कप्प्यांचा वापर शेंगदाण्याचं कूट, दही नेण्यासाठी उत्तमपणे करता येईल.

चिंच भिजत घालायला विसरलात?

अनेकजण आमटी, डाळ, रस्सा, शाकाहारी- मांसाहारी करी, अशा पदार्थांत चिंच घालतात. पण चिंचेचा कोळ करण्यासाठी चिंच आधी भिजत घालावी लागते. मात्र कित्येकदा अगदी आयत्या वेळी लक्षात येतं, की आपण चिंच भिजत घालायला विसरलो. अशा वेळी चिंच एका बाऊलमध्ये काढून घ्यावी आणि त्यात थोडं कोमट पाणी करून ते घालून ठेवावं. अगदी काहीच मिनिटांत चिंच मऊ होईल आणि पाणी कोमट असल्यानं हातानं कोळ करताना भाजणारही नाही.

हेही वाचा… पावसाळ्यातही त्वचेला मॉईश्चरायझर हवंच! का? वाचा…

काही वेळा मात्र पाणी गरम करायलासुद्धा गॅस मोकळा नसतो वा त्यासाठी वेगळा वेळ मिळत नाही. अशा वेळी सुगरणी एक नामी टिप वापरतात. ती म्हणजे लहान वाटीत चिंच घेऊन त्यात साधं (गरम न केलेलं) पाणी घालावं आणि जेव्हा आपण कुकर लावतो, तेव्हा कुकरच्या झाकणावर शिट्टीच्या शेजारी ही वाटी ठेवून द्यावी. गरम कुकरच्या उष्णतेनं काही मिनिटांतच वाटीतलं पाणी गरम होतं आणि मग चिंचेचा कोळ झटपट करता येतो.

lokwomen.online@gmail.com