जगभरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्ये आढळणारा हा कर्करोगाचा फार गंभीर प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतोय. स्त्रियांमध्ये वाढता लठ्ठपणा, वाईट जीवनशैली अशा काही कारणांमुळे गेल्या काही वर्षात स्तनाच्या कर्करोगाची समस्या वाढताना दिसतेय. यात अलीकडेच लॅन्सेटच्या अहवालातून स्तनाच्या कर्करोगाबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. २०४० सालापर्यंत स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि मृत्यूचा धोका कितीतरी पटीने वाढण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भारतात स्तनाच्या कर्करोगाबाबत काय स्थिती आहे? आणि तो रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ..

कोलकाता येथील टाटा मेडिकल सेंटरमधील वरिष्ठ क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संजय चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्णाविषयी माहिती दिली. डॉ. संजय चॅटर्जी म्हणाले की, पस्तीस वर्षीय शीला सिन्हा यांनी कल्पनाही केली नव्हती की, प्रसूतीनंतर सहा महिन्यांनी त्यांच्या स्तनामध्ये वेदनाहिन गाठ तयार होतील आणि त्यानंतर ती फुफ्फुस, यकृतात पसरून तिचे कर्करोगात रुपांतर होईल. आर्थिक स्थिती व्यवस्थित असतानाही शीला तपासणी न करता केवळ पर्यायी औषधांवर अवलंबून राहिल्या. अशाने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि कर्करोग त्यांच्या शरीरभर पसरला. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे पॅलिएटिव केयर उपचार पद्धती हाच एकमेव पर्याय होता.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women sjr
First published on: 19-04-2024 at 00:11 IST