Upsc Success Story: वडील चाट-पकोडे विकून संसाराचा गाडा हाकत असतानाच तिने यूपीएससीचे स्वप्न पाहिले. उच्च शिक्षण घेऊन परीक्षेची तयारी केली. ध्येयपूर्तीसाठी रात्रीचा दिवस केला अन् शेवटी यश मिळाले. ती यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील दीपेश कुमारीची ही संघर्षकथा.

देशभरातून लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात, पण फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळतं. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी ही एक परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन कोणीही आयएसएस दर्जाचा अधिकारी बनू शकतो. पण यूपीएससी परीक्षा पास होणं तितकं सोपं नाही. मात्र, बिकट परिस्थितीवर मात करत दीपेश कुमारीनं यूपीएससी परीक्षेत ९३ वा क्रमांक पटकावला आहे.

शिष्यवृत्तीच्या मदतीने पूर्ण केलं शिक्षण

दीपेशचे वडील गोविंद हे २० वर्षांपासून एका हात गाडीवर चाट-पकोडे विकत आहेत. दीपेश कुमारी हीने सात जणांच्या कुटुंबात एका छोट्या घरात राहून हे यश संपादन केलं आहे. दीपेश कुमारी पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. दीपेश कुमारीला परिक्षेतील चांगल्या गुणांमुळे सर्वत्र शिष्यवृत्ती मिळाली.त्याच शिष्यवृत्तीच्या मदतीने तिने पुढील शिक्षण घेतले. दीपेश कुमारीच्या शिक्षणाला भरतपूरमधीन सुरुवात झाली. पुढे तिनं जोधपूरच्या एमबीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने आयआयटी बॉम्बेमधून मास्टर्स केले, जिथे तिने फेलोशिप मिळाली.

अपयश पचवत घेतली भरारी

२०१९ मध्ये, दीपेशने दिल्लीतील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. तेव्हाच कोरोनाचं संकट आलं, मात्र संघर् हाष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. कित्येकांच्या नशिबात तर तो पाचवीलाच पुजलेला असतो. मात्र, काही संयमी आणि जिद्दी माणसं सर्व आव्हानं, सर्व परीक्षा, पराभव गिळत पुढे चालत राहतात. आणि एकेदिवशी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वत:ला सिद्ध करुन दाखवतात. ते जिंकतात. दीपेशनेही सुरुवातीच्या अडथळ्यांना न जुमानता, टिकून राहून तिच्या दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीचा टप्पा गाठला आणि यूपीएससी परीक्षेत ९३ वा क्रमांक पटकावला.

हेही वाचा >> एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यथोगाथा

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा उद्देश

यानंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना पुढे नेण्याचा माझा उद्देश असल्याचं दीपेश कुमारी सांगतात. तसेच दीपेश तिच्या विजयाचे श्रेय तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याला देते.