मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
'छोटा हाथी' म्हणून तमाम वाहतुकदारांचा साथी बनलेल्या टाटा एसने गेल्या साडेसात वर्षांत १० लाख वाहनविक्रीचा अनोखा टप्पा पार केला आहे.
मे २००५ मध्ये टाटा मोटर्सने टाटा एस हे छोटेखानी वाणिज्य वापरासाठीचे चारचाकी वाहन भारतीय बाजारपेठेत आणले होते. एक टन वजन वहन क्षमतेच्या वाहन विक्री क्षेत्रात त्याने कडवी स्पर्धा निर्माण केली. यानंतर दोन वर्षांनी कंपनीने याच ब्रॅण्डखाली चार चाकी प्रवासी वाहनही सादर केले. या दोन्हीची संख्या ऑक्टोबर २०१२ अखेर १०,५९,१३५ झाली आहे. यामध्ये देशात विकले गेलेल्या एसची संख्या ९,९७,१३३ आहे. विविध २४ देशात हे वाहन निर्यात होते. १० विविध प्रकारात हे वाहन उपलब्ध आहे. कंपनीचा आता या क्षेत्रात ८० टक्क्यांपर्यंतचा बाजारहिस्सा आहे.
एक लाख माल वाहतूक वाहनाचा विक्रमही एसने २०१० मध्ये नोंदविला होता. तर अवघ्या दोन वर्षांत ५ लाख वाहन विक्री पार केली गेली. कंपनीच्या पंतनगर (उत्तराखंड) येथील या वाहनाची निर्मिती क्षमता आता वार्षिक ५ लाख आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















