जर्मनीत हॅनोवर येथे मुख्यालय असलेल्या वाहनांसाठी चासिस, पॉवरट्रेन, वाहनाअंतर्गत पूरक सामग्री ते टायरनिर्मितीच्या व्यवसायात असलेल्या काँटिनेन्टल एजीने देशांतर्गत प्रवासी वाहनांसाठी टायरची निर्मिती उत्तरप्रदेशातील मोदीपुरम येथील प्रकल्पातून सुरू करून, पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. वार्षिक ८ लाख टायर्स निर्मितीची प्रकल्पाची सध्याची स्थापित क्षमता भविष्यात आणखी वाढण्याला वाव आहे. काँटिनेंटल इंडियाचे टायर व्यवसाय विभागाचे प्रमुख निकोलाइ सेट्झर यांनी अलीकडेच या प्रकल्पातून निर्मित भारतीय बाजारपेठेसाठी दाखल झालेली ‘कॉन्टिमॅक्स कॉन्टॅक्ट एमसी ५’ आणि ‘काँटी कम्फर्ट कॉन्टॅक्ट सीसी५’ अशा दोन प्रीमियम टायर्सच्या श्रेणींचे अनावरण केले.