डेमलर इंडिया कमíशयल व्हेइकल्स प्रा. लि. (डीआयसीव्ही) या डेमलर एजीच्या मालकीच्या उपकंपनीने दक्षिण भारतातील ओरागदम कारखान्यात २० हजार ट्रक उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
भारतबेंझ या पहिल्या अवजड ट्रकचे उत्पादन केल्यानंतर अडीच वर्षांत स्थानिक पातळीवर २० हजार ट्रकची निर्मिती करण्यात आली आहे. ओरागदमच्या या कारखान्यात भारतबेंझ २५२३ सीची निर्मिती बंद झाली आहे. या ट्रकपकी निम्मे ट्रक हे एका वर्षांत – २०१४ मध्ये तयार करण्यात आले होते.
२० हजार ट्रकचे उत्पादन करून आम्ही कंपनीच्या यशोगाथेतला पुढचा मलाचा दगड पार केला आहे, असे डेमलर इंडिया कमíशयल व्हेइकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक नेसेलहॉफ यांनी सांगितले. आधुनिक ट्रक येथे आणून आम्ही भारतीय ट्रक उद्योगाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.  उत्तम दर्जा, चांगल्या दर्जाची विक्री आणि विक्री पश्चात सेवा यांमुळे ग्राहकांनीही प्रतिसाद देत आमच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
डेमलरच्या उच्च दर्जाच्या नियमांनुसार ओरागदम येथे बनवण्यात आलेले  हे ट्रक आमच्या उत्पादन विभागासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचेही एरिक यांनी म्हटले.