फेडरल बँकेने ग्राहकांना ऑनलाइन इच्छापत्र करणे आणि अन्य सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवडय़ात अशी सेवा खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने सुरु केली होती. बँकेच्या ईझीविल या ऑनलाइन सुविधेचा वापर करण्यासाठी एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि वॉरमंड ट्रस्टीज अँड एक्झिक्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत भागीदारी केली आहे.
यामुळे बँकेच्या ग्राहकांना ऑनलाइन इच्छापत्र तयार करून आपल्या वारसाबाबत नियोजन करता येईल.   ईझीविलबाबतचा सहयोग प्रामुख्याने केरळमध्ये मुख्यालय असलेल्या बँकांमध्ये आहे. याबाबत नुकताच करार करण्यात आला. यामुळे, फेडरल बँकेच्या ग्राहकांना इच्छापत्र तयार करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा दिली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर खासगी क्षेत्रात अशामाध्यामातून अनोखा प्रयत्न होत आहे.