टाटा डोकोमोची कार्यशाळा
टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या टाटा डोकोमोने ग्राहकांसाठी शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता व्होल्टास हाऊस, चिंचपोकळी (पश्चिम) येथे होईल. टाटा डोकोमोच्या ग्राहकांना उत्पादन तसेच सेवांबाबत जागरुकतेसाठी ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेचा प्रतिसाद लक्षात घेऊन कंपनी असाच उपक्रम भविष्यातही काही कालावधी दरम्यान राबविणार आहे.

कोडॅकची लग्न छपाई सेवा
किरकोळ छपाई सुविधा क्षेत्रातील कोडॅकने लग्नाच्या अल्बमचा संग्रह दाखल केला आहे. यासाठी अभिजात, पारंपरिक आणि आधुनिक या तीन प्रकारात अल्बम आहेत. यामध्ये लग्ना आधीचे समारंभांची छायाचित्रे तसेच मुख्य विवाहसोहळा छायाचित्रीत करण्याचीस सोय आहे. या अल्बममध्ये शाश्वत आठवणींचे पुस्तकही समाविष्ठ करण्यात आले आहे.

टायटनची युवा वर्गाला व्हेलेन्टाईन पर्वणी
यंदाच्या व्हेलेन्टाईननिमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी टायटनने घडय़ाळांची नवी श्रेणी सादर केली आहे. विविध रंग आणि डिझाईनमध्ये ही घडय़ाळे १,४९५ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. युवा गटातील स्त्री तसेच पुरुषांची आवड लक्षात घेऊन टॅग्ड् या नावाखाली या घडय़ाळांची रचना करण्यात आली आहे.

ताराचे आकर्षक दागिने
यंदाचा व्हेलेन्टाईन साजरा करण्यासाठी तारा ज्वेलर्सने तयार दागिन्यांची विशेष श्रेणी सादर केली आहे. यामध्ये प्रेमाचे प्रतिक असलेल्या हृदयाच्या आकारातील पेण्डन्ट, चकाकत्या हिऱ्यांचा समावेश असलेला नेकलेस तसेच आकर्षक आणि विविध डिझाईनमधील कानातले यांचा अंतर्भाव आहे. क्लासिक डिझाईन आणि माफक किंमत हे यंदाचे आकर्षण असल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या अधिकृत दालनांमध्ये हे दागिने उपलब्ध आहे.

केसचे अद्ययावत वाहन
केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेन्टने ७५२ या टॅंडम कॉम्पेक्टर वाहनातील अद्ययावत केलेला बदल नुकताय मुंबईत आयोजित आयोजित केलेल्या प्रदर्शनादरम्यान प्रकर्षांने मांडला. वायब्रेटरी कॉम्पेक्टर उत्पादन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या कंपनीच्या या वॉटर कूल्ड इंजिन वाहनामुळे तापमान कमी ठेवण्यास मदत होते. किर्लोस्कर कंपनीने तयार केलेले इंजिन यात बसविण्यात आले आहे. त्याची वजन भार क्षमता १०,५६० किलो आहे. वांद्रे-कुर्ला संकूल येथे ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या बाऊमा इंडिया प्रदर्शनात हे वाहन ठेवण्यात आले आहे.
गितांजलीची नवी दागिने शृंखला
तयार दागिने निर्मितीतील गितांजली समूहाने अनुष्का शर्माच्या प्रमुख उपस्थितीने मुंबईत नुकतेच ‘सिझन्स ऑफ लव’ मालिकेंतर्गत दागिन्यांची नवी शृंखला सादर केली. यंदाच्या व्हेलेन्टाईनच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या या दागिन्यांमध्ये कंपनीच्या गिली या ब्रॅण्डचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत २० हजार रुपयांचे हिऱ्यांचे दागिने खरेदी केल्यास २० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. ही योजना २४ फेब्रुवारीपर्यंत आहे.

ईझीडेची स्वस्ताची मोहिम
ईझीडे आणि ईझीडे मार्केट स्टोअर्सने कमी किंमतीत वस्तू उपलब्ध करून देण्याची मोहिम सुरू केली आहे. याद्वारे २३ फेब्रुवारापर्यंत खरेदीदारांना एमआरपीपेक्षा कमी किंमतीतील खाद्यपदार्थ तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. ईझीडे आणि ईझीडे मार्केट स्टोअर तसेच ईझीडे हायपर स्टोअर हे भारती एन्टरप्राईजेसमार्फत चालविले जातात.