फंडाचा गुंतवणूक प्रकार    : गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला (ओपन एंडेड) समभाग गुंतवणूक (इक्विटी) फंड   
जोखीम प्रकार     : करडा रंग- धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)    
फंडाच्या परताव्याच्या     : एस अँड पी बीएसई १०० निर्देशांक तुलनेसाठी निर्देशांक             
निधी व्यवस्थापक    : समभाग विश्लेषण व गुंतवणुकीचा १२ वर्षांचा अनुभव असलेले मृणाल सिंग हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. सिंग यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्यांनी वित्तीय व्यवस्थापनातील     पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीत ते जून २००८ मध्ये दाखल झाले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाव्यतिरिक्त ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिडकॅप, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड व आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅडव्हायझर सिरीज या फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत.
पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड पे आऊट)/ पुनर्गुतवणूक
फंड खरेदीची पद्धती : १८०० २०० ६६६६ (एमटीएनएल व बीएसएनएल वगळून) या     क्रमांकावर (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत) संपर्क अथवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या विक्रेत्यामार्फत अथवा http://www.icicipruamc.com संकेतस्थळावरून थेट खरेदी.
av-03
आगामी दोन – तीन वष्रे समभाग गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारे असतील. रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणांना यश येऊन कमी होत असलेली महागाई, त्याच्या अनुषंगाने कमी होत असलेल्या व्याजदरांमुळे अनेक प्रकल्पांना कर्ज घेणे सुसहय़ होईल. सरकार करीत असलेल्या उपाययोजना व उद्योगस्नेही धोरणे याचा परिणाम पायाभूत सुविधा क्षेत्रांतील अनेक प्रकल्पांना लवकर मंजुरी मिळून प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. या दिशा बदललेल्या अर्थ-आवर्तनाचे चित्र आमच्या गुंतवणुकांतून दिसेल.
मृणाल सिंग, फंडाचे निधी व्यवस्थापक

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची मालमत्ता साधारणत: ८००० कोटी रुपयांची असून हा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ तंत्राचा स्वीकार केलेला फंड आहे. हे तंत्र सर्वप्रथम बेंजामिन ग्रॅहम यांनी शोधून काढले. बेंजामिन ग्रॅहम हे प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे प्राध्यापक होते, ही त्यांची ओळख पुरेशी आहे. कोलंबिया विद्यापीठात वॉरेन बफे यांनी आपल्या पीएचडीचा प्रबंध ग्रॅहम यांच्या मार्गदर्शनात लिहिला. गेली १० दहा वष्रे याच तंत्राने गुंतवणूक करणारा व अव्वल परतावा देणारा फंड अशी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची ओळख आहे. सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स हा निर्देशांक या फंडाचा मानदंड आहे. एक वर्ष, तीन वष्रे, पाच वष्रे व दहा वष्रे या कालावधीत या फंडाने आपल्या संदर्भ निर्देशांकापेक्षा अव्वल परतावा दिला आहे.
av-05
या फंडाचा संदर्भ निर्देशांक जरी मिडकॅप निर्देशांक असला तरी हा फंड केवळ मिडकॅप फंड नव्हे. या फंडाच्या गुंतवणुकीत अव्वल मूल्यांकन असलेल्या मिड कॅप तसेच लार्ज कॅप समभागांचा समावेश आहे. हा फंड मल्टिकॅप फंड आहे. अव्वल मूल्यांकन असलेल्या शेअरमध्ये तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करून भांडवली नफा कमविणे, असे या फंडाचे धोरण आहे. अव्वल मूल्यांकन असलेले शेअर शोधण्यासाठी उत्सर्जनाचे किमतीशी प्रमाण (पीई), किमतीचे पुस्तकी किमतीशी प्रमाण (प्राइस टू बुकव्हॅल्यू) अशा पारंपरिक गुणोत्तरांच्या जोडीला निधी व्यवस्थापक आपल्या अनुभवाच्या जोरावर असे शेअर शोधत असतो. काही वेळेस निधी व्यवस्थापक प्रवाहाविरुद्ध (कॉट्रा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी) विचार करून गुंतवणूक करत असतो. अशी प्रवाहविरुद्ध राबवलेली धोरणे नजीकच्या काळात जरी फळली नाहीत तरी दीर्घ काळात ही यशस्वी होतात. उदाहरणार्थ, गेल्या एक वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रीयीकृत बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाबद्दल चिंता व्यक्त होताना या शेअरमध्ये मोठी विक्री होत होती तेव्हा गेल्या एका वर्षांच्या नीचांकाच्या आसपास खरेदी करून जानेवारी २०१५ दरम्यान जेव्हा या बँका त्यांच्या एक वर्षांतील सर्वोच्च भाव नोंदवीत होत्या तेव्हा हा फंड आपल्या गुंतवणुकीतील बँकांचे शेअर विकत होता. ३१ जानेवारी २०१५ रोजी फंडांच्या गुंतवणुकीत एकाही राष्ट्रीयीकृत बँकेचा शेअर नाही. आपल्या वित्तीय उद्दिष्टांसाठी दीर्घकालीन म्हणजे पाच ते सात वर्षांसाठी थांबण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एसआयपी करण्यास हा आदर्श फंड आहे.                                                        mutualfund.arthvruttant@gmail.com