वैभवी कुलकर्णी सप्टेंबर महिन्याच्या अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत आहेत. त्या ‘ब्लॅक ओशन कॅपिटल पार्टनर्स’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या भागीदार आहेत. त्यांची कंपनी परदेशी परदेशी गुंतवणूकदारांना सेवा पुरविते.

‘इंडियन फाइन ब्लँक’ या शब्द संचयातील आद्याक्षरांपासून ‘आयएफबी’ या नाममुद्रेचा जन्म झाला. कोलकातास्थित आयएफबी समूहातील ही मातृ कंपनी म्हणून आयएफबी इंडस्ट्रीज लिमिटेड आज ओळखली जाते. या समूहात आयएफबी अ‍ॅग्रो व आयएफबी ऑटोमोटिव्ह या दोन अन्य कंपन्या आहेत.
आयएफबी इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यत्वे दोन प्रकारचा व्यवसाय करते. पहिला ‘ब्लँकिंग टूल्स’ जी वाहन उद्योगासाठीच्या सुटे भाग तयार करणाऱ्या उद्योगात (ऑटो अ‍ॅन्सिलरी) वापरली जातात. कंपनीचा दुसऱ्या गटात गृहोपयोगी वापराच्या वस्तू (व्हाइट गुड्स) यांचा समावेश होतो. कंपनी कपडे धुवायची यंत्रे, ताटे विसळायची यंत्रे (डिश वॉशर्स), स्वयंपाकघरात वापरासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक कूकर यांची उत्पादक आहे. समोरून धुण्यासाठी कपडे टाकायची फ्रंट लोड यंत्रे कंपनीने भारतात पहिल्यांदा जर्मनीच्या बॉशच्या सहयोगाने व ‘आयएफबी बॉश’ या संयुक्त नाममुद्रेने बाजारात आणली.
कंपनीने १९७४ मध्ये हेन्रीच स्मिड या स्विर्झलडच्या कंपनीबरोबर तांत्रिक सहयोगाने वाहन उद्योगासाठी कोलकोता येथे फाइन ब्लँक सुटे भाग व ‘ब्लँकिंग टूल्स’ उत्पादनास प्रारंभ केला. सध्या कंपनीचे दोन कारखाने कोलकाता व बंगळुरू येथे कार्यरत आहेत. १९९१ मध्ये कंपनीने गृहोपयोगी वापराच्या वस्तूंच्या व्यवसायात पदार्पण केले. यासाठी कंपनीने गोव्याच्या वेर्णे औद्योगिक वसाहतीत आपला कारखाना उभारला आहे. कंपनी या यंत्रांसाठी सुटे भाग चीन, तुर्कस्थान, अमेरिका इथून मागवते व या सुटय़ा भागांची जुळणी करून गोव्यात आपली उत्पादने तयार करते. कंपनीने आपली उत्पादने विकण्यासाठी देशभरात २२० वितरक नेमले असून २,२०० अभियंते विक्रीपश्चात सेवा पुरवीत आहेत.
कंपनीचा गोव्यातील कारखान्यातील ‘फ्रंट लोिडग’ वॉिशग मशीन जुळणी मंचाकडून उत्पादन क्षमतेच्या ३५ टक्के उत्पादन सुरू आहे. एका जपानी उत्पादकासोबत कंत्राटी तत्त्वावर वॉिशग मशीन उत्पादने तयार करण्यासाठी कंपनीची बोलणी सुरू असून ही बोलणी शेवटच्या टप्प्यात आहेत. कंपनी व्यवस्थानासोबत झालेल्या आमच्या भेटीत व्यवस्थापनाने ही माहिती दिली आहे. तिसऱ्या तिमाहीत या कंपनीसाठी कंत्राटी तत्त्वावरचे उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे. आíथक वर्ष २०१५ मध्ये उत्पादन क्षमतेची पातळी ५० टक्के, तर आर्थिक वर्ष २०१७ मध्ये उत्पादन क्षमतेची पातळी ७० टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. या वाढलेल्या पातळीमुळे उत्पादन अन्य खर्च (ड५ी१ँीं२ि) वाचेल व कंपनीच्या नफाक्षमतेत वाढ होईल व कंपनी आयात करीत असलेल्या सुटय़ा भागासाठी खर्च होणाऱ्या परकीय चलन व्यवहारातील जोखीम कमी करणे शक्य होईल.
कंपनीने १९९१-९२ मध्ये बॉशबरोबर सहकार्याचा करार करून काही उत्पादनांच्या उत्पादनास प्रारंभ केला. बॉशला कंपनीच्या भागभांडवलात वाटा हवा होता. तांत्रिक भागीदाराकडून झालेली ही मागणी आयएफबीच्या व्यवस्थापनास मंजूर नसल्याने हा आठ वर्षे सुरू राहिलेला सहयोगाचा करार संपुष्टात आला. यामुळे २००१ नंतर आयएफबी नवीन उत्पादने फारशी विकसित करू शकली नाही. तथापि, येत्या सणासुदीचा मोसम लक्षात घेऊन एसी, टॉप लोिडग वॉिशग मशीनची नवीन मॉडेल्स, कंपनीने बाजारात उतरविण्याचे ठरविले आहे. यासाठी सर्व तयारीही पूर्ण झाली असून पूर्व भारतात दुर्गापूजेच्या निमित्ताने तर उर्वरित भारतात दसरा-दिवाळीनिमित्ताने ही उत्पादने उपलब्ध होतील. तसेच १ ऑक्टोबरपासून कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत १५-२० टक्के वाढ करण्याचे धोरण आखले आहे.
 

महत्वाचा खुलासा :
विश्लेषकांनी त्यांच्या कंपनीकडून सल्ला घेणाऱ्या ग्राहकांना या कंपनीच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस केली आहे. त्यानुसार ‘हेज फंडां’कडून ही गुंतवणूक झालीही असेल किंवा भविष्यात ते गुंतवणूक करतील. यामुळे या कंपनीच्या समभागांच्या किंमतीत वाढ होणे हे विश्लेषकाच्या स्वारस्याचे ठरू शकते, याची वाचकांनी दखल घ्यावी.