मेष
श्री गुरूवैय नम: या नामाचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
पुरूष सुक्तांचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सांयकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पोपटी

मिथुन
दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण सायंकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाशी चालवावीत.
आजचा रंग – पिवळा

कर्क
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलीची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

सिंह
दिवसभर गुरू स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पिवळा

कन्या
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

तुळ
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक
ओम श्रीं गुरूनाथाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

धनु
गुरूचरित्र पारायण करावे. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – फिकट हिरवा

मकर
गणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. सर्व लाभंनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
श्रीं आदि गुरवैय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- पिवळा

मीन
कणकधारा स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण संध्याकाळी ६.१३ पर्यंत वृश्चिक राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – करडा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu