‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. अभिनेत्याचे चाहते त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखतात. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून याची प्रचिती मिळते.

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात एन्ट्री घेतली. पहिल्याच भागात गौरवने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. आता येत्या भागात हा मराठमोळा अभिनेता चक्क जुही चावला हिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे.

gaurav more left maharashtrachi hasya jatra
“तुझ्याशिवाय शो अधुरा वाटेल…”, गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, म्हणाले…
Maharashtrachi Hasyajatra fame Gaurav more answer to trollers
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंमत असेल तर…”
Gaurav More in bahubali kalakeya look viral on social media
“आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
gaurav more and madhuri pawar dances on govinda song
Video : “किसी डिस्को में…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स, जोडीला होती ‘ही’ मराठी अभिनेत्री
maharashtrachi hasya jatra fame gaurav more
“पहिली गाडी घेतली पण, तेव्हा बाबा नव्हते”, वडिलांच्या आठवणीत गौरव मोरे भावुक; म्हणाला, “मी आणि आई…”
gaurav more meets alka kubal and bharat jadhav on the set
Video : गौरव मोरेने घेतली अलका कुबल व भरत जाधव यांची भेट! पाहताक्षणी दोघांच्या पाया पडला अन्…, सर्वत्र होतंय कौतुक
bhushan kadu reveals why he left maharashtrachi hasya jatra
“हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! व्हिडीओमध्ये दिसली कुटुंबाची झलक, म्हणाली…

जुही चावला आणि शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार आहे. ‘तू है मेरी किरण!’ हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेता जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो, गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो. हे सगळं पाहून अभिनेत्री सुद्धा आनंदी होते. पुढे, या स्किटमध्ये सुगंधाची एन्ट्री होती.

गौरव आणि सुगंधाच्या जुगलबंदीवर जुही खळखळून हसत असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा एपिसोड येत्या शनिवार-रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा

दरम्यान, गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “तिकडे पण आग लावणार गौरव सर”, “गौरव तुझा अभिमान वाटतोय”, “थेट जुही चावला वाह” अशा प्रतिक्रिया देत गौरवच्या चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.