ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे सेंटर फॉर मॅनेजमेंट असोसिएशन व अलिगढ मुस्लिम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन- प्रशासन विषयातील संशोधनपर पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांकडून नोंदणी करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, मानव्य शास्त्रे, विधी, अभियांत्रिकी यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा चार्टर्ड अकाउंटंट अथवा कॉस्ट अकाउंटन्सी यांसारख्या विषयांतील पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.

प्रवेश प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना रिसर्च मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजेच ‘आरएमएटी २०१५’ ही नोंदणी पात्रता परीक्षा द्यावी लागेल. ही नोंदणी पात्रता परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १२ डिसेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश आहे.
उमेदवारांची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व नोंदणी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची संशोधनपर पीएच.डी.साठी नोंदणी करण्यात येईल.

अर्जासह भरायचे शुल्क
अर्जदारांनी अर्जासह भरायचे शुल्क म्हणून १५०० रु.चा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

अधिक माहिती
संशोधनपर पीएचडीसंदर्भात अधिक माहितीसाठी मॅनेजर (पीएच.डी.- प्रोग्रॅम्स) एआयएमएसीएमई, मॅनेजमेंट हाऊस, १४, इन्स्टिटय़ुशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर संपर्क साधावा अथवा http://www.aima.in किंवा http://apps.aima.in/ phd2015dec या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत संपर्क साधावा.