अल्बर्ट आईनस्टाईनने शंभर वर्षापूर्वी भाकित वर्तविलेल्या अंतराळातील गुरूत्वाकर्षण लहरींचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. अवकाश विज्ञानातील आजवरचा हा सर्वात मोठा शोध मानला जात आहे. यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचंही मोठं योगदान असल्याचं सांगितलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये सहभागी सर्व वैज्ञानिकांचे ट्विटरवरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

black-holes-main