महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार यंदा बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी, ते २६ मार्च २०१५ या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ ते २६ मार्च २०१५ या कालावधीत पार पडणार आहेत.
बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०१५ या कालावधीत पार पडणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकाविषयी काही हरकती असल्यास, त्या एक महिन्याच्या आत मंडळाला कळवाव्यात, अशी सूचना मंडळातर्फे करण्यात
आली आहे.