चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्यानंतर क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकादा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चर्चा रंगताना दिसत आहे. २४ जूनपासून इंग्लंडच्या मैदानातून महिला क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी असून साखळी सामन्यात प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेत सात सामने खेळेल. भारतीय महिलांचा या स्पर्धेतील पहिला सामना हा इंग्लंडच्या महिलांसोबत खेळवण्यात येईल. मात्र या सामन्यापेक्षा २ जूलैला भारत- पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्याचा जल्लोष महिला क्रिकेटच्या मैदानात कितपत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. महिला क्रिकेट मैदानातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा अव्वल आहे. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ९ सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानी महिलांना सर्व सामन्यात पराभूत करण्यात यश आले आहे.

१९७३ पासून सुरु झालेल्या स्पर्धेचे हे दहावे सत्र आहे. पुरुषांप्रमाणेच महिला विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारतीय महिलांनी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. भारतीय महिलांनी यावेळी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. सध्याच्या भारतीय संघाचा समतोल आणि त्यांचा खेळ पाहाता या स्पर्धेत संघाकडून चांगल्या खेळाच्या अपेक्षा आहेत.

आयसीसी महिला विश्वचषक २०१७ वेळापत्रक

२४ जूनः न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, भारत विरुद्ध इंग्लंड
२५ जूनः दक्षिण अफ्रीका विरुद्ध पाकिस्तान
२६ जूनः ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडीज
२७ जूनः इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
२८ जून: दक्षिण अफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड
२९ जून: भारत विरुद्ध वेस्टइंडिज, श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२ जुलै: भारत विरुद्ध पाकिस्तान, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका,
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज
५ जुलै: भारत विरुध्द श्रीलंका, इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रीका,
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
६ जुलै: न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज
८ जुलै: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका,न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान
९ जुलै: दक्षिण अफ्रीका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज
११ जुलै: वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान
१२ जुलै: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका,
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
१५ जुलै: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका विरुद्ध ऑस्ट्रेलिया,
इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

१८ जुलै: पहिला उपांत्य सामना
२० जुलै: दुसरा उपांत्य सामना
२३ जुलै: अंतिम सामना