जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कोनेरू हम्पीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चीनमध्ये होणाऱ्या विश्व सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत अभूतपूर्व कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हम्पीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात ग्रँडमास्टर द्रोणावली हरिका, पद्मिनी राऊत, माजी विश्व कनिष्ठ विजेती सौम्या स्वामीनाथन आणि दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या मेरी अ‍ॅन गोम्स यांचा समावेश आहे.  नऊ फेरीत ही स्पर्धा होणार असून सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे. भारतासमोर चीन, रशिया, अर्मेनिआ आणि जॉर्जिया या तगडय़ा प्रतिस्पध्र्याचे आव्हान आहे.