आंतरविभागीय देवधर करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत पश्चिम विभागाच्या संघात बडोद्याच्या मुनाफ पटेलचे आगमन झाले आहे. दुखापतीमुळे मुनाफ विश्वविजयानंतर एकही सामना खेळला नव्हता. ही स्पर्धा १०-१३ मार्च दरम्यान गुवाहाटी येथे होणार आहे. पश्चिम विभागाचे कर्णधारपद पार्थिव पटेलकडे देण्यात आले आहे.
पश्चिम विभागाला या स्पर्धेत पुढची चाल देण्यात आली असून ते थेट उपांत्य फेरीत खेळतील. हा सामना १२ मार्चला होणार असून दक्षिण आणि पूर्व विभाग यांच्यातील विजेत्याबरोबर ते खेळतील.
या संघात मुंबईच्या वासिम जाफर, रोहित शर्मा, अभिषेक नायर आणि धवल कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला आहे.
पश्चिम विभागाचा संघ : पार्थिव पटेल (कर्णधार), वासिम जाफर, अंबाती रायुडू, रोहित शर्मा, केदार जाधव, युसूफ पठाण, अभिषेक नायर, मुनाफ पटेल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, राकेश ध्रुव, कमलेश मकवाना, मनप्रीत जुनेजा, आदित्य वाघमोडे आणि विजय झोल.