अलीकडे बहुतेकांना आपले दैनंदिन आयुष्य स्मार्ट करणारे साधन म्हणजे स्मार्टफोन असे वाटते. विविध आकाराच्या-रंगांच्या आणि स्टाइलच्या या स्मार्टफोन्समधील विविध अॅप्स आपल्या वेगवेगळ्या प्रकारे साहाय्य करतात. आपले आयुष्य अधिक आनंददायी आणि सुलभ करणाऱ्या या अॅप्सची सतत निर्मिती आणि विकास होत असतो. आजपावेतो लक्षावधी अॅप्सची निर्मिती झाली असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. एखादी भन्नाट कल्पना सुचून असे अॅप्स विकसित होत आहेत. अशी कल्पना तुम्हा-आम्हालाही सुचू शकते. त्यातून एखाद्या नावीन्यपूर्ण अॅप्सचा जन्मही होऊ शकतो. अॅप्सची निर्मिती हा एक करिअरचा पर्याय निवडता येऊ शकतो. सर्जनशील मन असलेल्या आणि हटके काम करण्याची क्षमता असणारी कोणतीही व्यक्ती या करिअरकडे वळू शकते.  संगणकशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तींना अॅप्स निर्मिती व विकास याबाबत करिअर करणे सोपे जाऊ शकते. पण या क्षेत्रात मनापासून स्वारस्य असणाऱ्या व्यक्तीही प्रयत्न आणि परिश्रमाच्या जोरावर या क्षेत्रात आपली पावले रोवू शकतात.  या अनुषगांने मणिपाल ग्लोबल एज्युकेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मणिपाल प्रोलर्न या संस्थेने अॅण्ड्रॉइड अॅप डेव्हलपमेंट हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन म्हणजेच घरच्या घरी करता येतो. या अभ्यासक्रमात अॅपची निर्मिती आणि विकास, संकल्पनेचा विकास, अॅप डिझायिनग, अॅण्ड्रॉइड कार्यप्रणाली, अॅप्ससाठी आवश्यक असणारे विविध डाटाबेस, अॅप देण्यासाठी आवश्यक ठरणारे क्लाऊड डाटा सव्र्हर, मल्टिमीडियासह अॅप्सची निर्मिती, अॅप्सचे लेआऊट, अॅप्सच्या अनुषगांने विविध सेवा, नवे प्रकल्प, बहुविध स्क्रीनची निर्मिती,कनेक्टिव्हीटी अशा या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

संपर्क –

http://www.manipalprolearn.com

info@manipalprolearn.com