आपणावर दोषारोपपत्र दाखल असले तरी शासनाकडून लोकप्रतिनिधीवर खटला चालविण्याची परवानगी नसल्याच्या मुद्यावर आ. सुरेश जैन यांनी मागितलेला जामीन उच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. कोटय़वधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
सरकारी वकील व त्रयस्थ अर्जदार नरेंद्र पाटील यांच्या वकिलांकडून या प्रकरणी सवरेच्य न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिल्यानंतर न्या. एम. टी. जोशी यांनी या महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
जैन यांना १० मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सुटकेसाठी त्यांच्यामार्फत विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले. एक जून रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होत़े