भिवंडी-वाडा महामार्गावर खुपरी गावाजवळ ट्रकने धडक  देऊन झालेल्या अपघातात एका सायकलचालकाचा मृत्यू झाला. मधुकर पाटील (४६) असे या सायकलचालकाचे नाव आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला पेटवले.येथील भिवंडी-वाडा महामार्गावरून मधुकर पाटील जात होते. यावेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला. यानंतर ट्रकचालकाने पलायन केले. दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत कोणीच ट्रक घेण्यास आले नाही. यामुळे संतप्त जमावाने ट्रकला पेटवून दिले. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे.