नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांबरोबरच यंदा पारंपरिक कुंभार व्यवसायालाही बसला आहे. या नोटाबंदीमुळे दरवर्षी हमखास खात्रीचा असलेल्या मकरसंक्रांतीच्या सुडके, बोळके, सुगड बनवणे आणि विक्रीमध्ये अनंत अडचणींना सामना द्यावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास २० टक्के व्यवसाय कमी झाल्याचे पंढरपूर येथील भिकू विठोबा कुंभार याने सांगितले.

सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होणारा काळ म्हणजे मकरसंक्रांत. ‘‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला,’’ असे म्हणत हा सण साजरा केला जातो. याच दिवशी महिला वाण-वसा करून संसार सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना देवाकडे करीत असते. या वाण-वसाला लागणारे सुगड, बोळके, सुडके हे बनवण्याचे काम कुंभार बांधवांचे पूर्ण झाले आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीकाठची काळी माती आणून त्यामध्ये राख आणि घोडय़ाची लीद मिसळून एक मातीचा लगदा बनवला जातो. त्यानंतर पारंपरिक फिरत्या चाकावर या मातीला आकार देत कुंभार बांधव अतिशय आकर्षक मडके, सुडके बनवतात. त्यानंतर याला भट्टीत भाजले जाते आणि बनवलेले सुडके, बोळके विक्रीसाठी बाजारात येते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

बाजारात या वस्तू खरेदीसाठी महिलांची झुंबड उडते. यंदाच्या वर्षी २० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत याची किंमत आहे, मात्र या व्यवसायालाही आता नोटाबंदीची संक्रांत लागली आहे. गेल्या वर्षी व्यापारी सणाच्या आधी २५ टक्के रक्कम आधी देत होता. तर उरलेली रक्कम माल खरेदी करताना देऊन जात होता. यंदाच्या वर्षी नोटाबंदीमुळे ना व्यापाऱ्याकडे पसा ना कारागिराकडे. त्यामुळे उधारउसनवारीवरच हा व्यवहार सुरू असल्याचे पंढरपूरचे बुजुर्ग कारागीर भिकू विठोबा कुंभार याने लोकसत्ताशी बोलताना सांगितले. यामुळे जवळपास २० टक्के व्यवसायात घट झाली आहे. त्याचप्रमाणे आमच्या कलेची कवडीमोल किंमत केली जात असल्याचेही कुंभार बांधव बोलत आहेत. असे जरी असले तरी आपली कला आणि परंपरा मिळेल त्या मोबदल्यात आनंदाने कुंभार बांधव करीत आहेत हेही विशेषच मानावे लागेल.

नव्या तंत्रज्ञानाचा आधार

‘फिरत्या चाका वरती घेती मातीला आकार’ या अभंगावर कुंभार समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून त्याला जसे पाहिजे तसा आकार देत वस्तू बनवली जाते. आता या फिरत्या चाकाचा वापर हळूहळू कमी होत आहे. याचा वापर करताना उभे राहून तासन्तास काम करावे लागते. त्याच्याऐवजी आता इलेक्ट्रिक मोटारीचे चाक वापरण्यास सुरुवात केली आहे. कामाची दोन्हीकडे पद्धत तीच आहे. मात्र या नव्या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते असे तरुण व्यावसायिक महेश कुंभार याने सांगितले.