मुंबईची सुभेदारी शिवसेनेकडे कोणाकडे राहणार, शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार की भाजप बाजी मारणार, ठाण्यातील किल्लेदार कायम राहणार की नव्या सरदारांना संधी मारणार, पुण्याच्या सुभ्यात कोण घौडदौड करणार, नाशिकमधील सत्तेचा कुंभ मनसेच्या ताब्यात राहणार की हातून जाणार, अशा अनेक प्रश्नांचा फैसला करणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केले आहे. मतदार’राजा’ने सत्ता नेमकी कोणाकडे दिली आहे, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. राज्यातील हजारो उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे.

राज्यात आज (मंगळवारी) सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडले. ठाण्यात सर्वाधिक ५८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ठाण्या पाठोपाठ नाशिकमध्ये ६० टक्के मतदान झाले आहे. नागपूरमध्ये ५३ टक्के, सोलापूरमध्ये ६० टक्के, अमरावतीत ५५ टक्के, अकोल्यात ५६ टक्के, उल्हासनगरात ५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसा ठी मतदान पार पडले आहे. मतदान वाढावे, यासाठी राज्याच्या निवडणूक यंत्रणेने जनजागृतीच्या साऱ्या मार्गाचा पुरेपूर अवलंब केला होता. यासोबत अनेक स्वयंसेवी संस्थांनीदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचा परिणाम मतदानातून दिसून आला आहे. जिल्हा परिषदांच्या तीन हजार २१० जागांकरिता १७ हजार ३३१ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदा, आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, तसेच गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समित्यांमध्ये आज मतदान झाले. वर्धा जिल्हा परिषदेच्या दोन आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा जागांबरोबरच त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या १६ जागांसाठीही मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६५४ जागांसाठी दोन हजार ९५६ तर पंचायत समित्यांच्या एक हजार २८८ जागांसाठी पाच हजार १६७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.

Live Updates:

५.३०: मतदानाची वेळ संपली

५.१४: उल्हासनगर महापालिका निवडणुकीत ४.३० पर्यंत ४०.१२% मतदान

५.०५: दुपारी ३.३० पर्यंतची मतदानाची आकडेवारी: ठाणे- ४५.०५%, उल्हासनगर- २४.८३%, नाशिक- ४३.३३%, सोलापूर-४३.००%,

अमरावती- ३४.३७%, अकोला- ४६.३०%, नागपूर- ४०.००%

४.५०: अमरावती महानगरपालिका निवडणुकीत दुपारी ३.३० पर्यंत ४२.५१% मतदान

४.४०: नाशिकमध्ये मतदानांवर टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला; विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून चिठ्ठ्या जप्त

४.१९: नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी ३.३० पर्यंत  ४३.३३% मतदान

३.५६: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातील मतदानाची टक्केवारी (दुपारी १.३० पर्यंत झालेले मतदान): रायगड- ४४.५८%, रत्नागिरी- ३८.५६%, सिंधुदुर्ग- ४५.२७%, नाशिक- ३४.३३%, पुणे- ३९.६८%, सातारा- ४२.२३, सांगली- ३८.२३%, सोलापूर- ३६.८१%, कोल्हापूर- ४३.५९%, अमरावती- ३२.०२%, गडचिरोली- ४४.६७%

३.४९: ठाणे- १९.३०%, उल्हासनगर- १२.८७%, नाशिक- १८.५४%, पिंपरी चिंचवड- २०.७३%, सोलापूर- १७.००%, अमरावती- १९.५८%, अकोला- १९.२४%, नागपूर- १८.००% (दुपारी १.३० पर्यंत झालेले मतदान)

३.४०: अकोला महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावtन बाहेर पडलेल्या गौरक्षण रोड परिसरातील  मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

३.१४: अमरावती जिल्हा परिषदेत दुपारी दीडपर्यंत २९ टक्के मतदान

३.१२: सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील ग. ल. कुलकर्णी प्रशालेत मतदानासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मतदान केंद्रातील रॅम्पवरुन पाय घसरल्याने मृत्यू

३.११: सोलापूर: प्रभाग क्रमांक १० मधील बूथ क्रमांक २४ मध्ये मतदाराने चुकीचे बटन दाबल्याने मतदान यंत्रात बिघाड

३.०४: नागपूरमध्ये २९ टक्के, तर सोलापुरात ३२ टक्के मतदान

३.०३: अमरावतीत दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१.६२ टक्के मतदान

३.०१ ः उल्हासनगरमध्ये दुपारी दीडपर्यंत २४.८३ टक्के मतदान

nashik-commissioner

२.५७: नाशिक महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सपत्नीक केले मतदान

nashik-senior-citizen

२.५३: नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

२.१९ : ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

२.१२ : अकोल्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ३१.५ टक्के मतदान

२.०८: ठाण्यात दुपारपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान

२.००: अकोल्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान

१.५१ : नाशिकमध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत ३०.६३ टक्के मतदान

१.४४: राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, उल्हासनगरसह दहा महापालिकांसाठी सकाळी साडेअकरापर्यंत सरासरी १७.०७ टक्के मतदान

thane-cast-vote

१.३३:  ठाण्यात दिलीप खाडे या तरूणाने लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क. (छाया – दीपक जोशी)

thane

१.२३:  ठाण्यातील मतदान केंद्रांवर पहिल्यांदा मतदान करणा-या मतदारांना मतदानानंतर चॉकलेट आणि फुलं देऊन त्याचं कौतुक करण्यात आलं. (छाया- दीपक जोशी)

१.१८ : उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेअकरापर्यंत १२.८७ टक्के मतदान

१२.५७: नागपूरमध्ये सकाळी ११.३० पर्यंत १६ टक्के मतदान

१२.५३: अमरावती महापालिका निवडणुकीत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २०.४३ टक्के मतदान

१२.५२: सोलापूरमध्ये सकाळी ११.३० पर्यंत २४ टक्के मतदान

१२.४९: अकोल्यात सकाळी साडेअकरापर्यंत १५ टक्के मतदान

१२.३७: नागपुरात साडेअकरापर्यंत १६ टक्के मतदान

cm-fadnavis

१२.३५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केले मतदान.

 

thane-shinde

१२.३२: ठाण्यात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांसह केले मतदान

१२.२४: ठाण्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी १९.११ टक्के मतदान

mohite-patil

१२.२१: माढा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूजमध्ये केले मतदान

१२.०५:  नाशिकमध्ये सकाळी ११.३० पर्यंत १८.५० टक्के मतदान

१२.०३: कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील कुशिरे तर्फ ठाणे येथे मतदान केंद्रावर कार्यरत पोलिसाला सरपंच विष्णू पाटील आणि कार्यकर्त्यांची मारहाण, कॉन्स्टेबल अभिजित शिपुगडे जखमी, मारहाण करणाऱ्यांना घेतले ताब्यात

११.५५:  ठाण्यातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये आणखीन ३ बोगस मतदारांना घेतले ताब्यात

११.४८: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, अनेक पक्षांचे उमेदवार मतदान केंद्रांमध्ये वावरताहेत, निवडणूक अधिकारी आणि पोलिसांचे दुर्लक्ष

११.४३: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी ११ पर्यंत सरासरी २० टक्के मतदान, अनेक प्रभागांमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा

११.३०: नागपूरमधील कुख्यात गुंड आणि शिवसेना उमेदवार अनिल धावडेच्या प्रभाग २२ मध्ये गुन्हेविषयक तक्ते मतदान केंद्राबाहेर लावले नसल्याचे उघड

११.२०: राज्यभरातील मतदारांचा उत्साह, मतदान केंद्रांबाहेर रांगा, पोलिसांचा चोख बंदोबस्त

११.१२: अकोला महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेनऊपर्यंत नऊ टक्के मतदान

११.०७: नागपुरात बूथ अधिकाऱ्यांना मनस्ताप, मतदान केंद्रापासून दूरवर वाहने थांबवल्याने वृद्धांची फरफट, ९० वर्षीय आजोबाला नातवाने मतदान केंद्रापर्यंत उचलून नेले

११.०३: दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ मध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के, प्रभाग क्रमांक २८ – १२ टक्के आणि
प्रभाग क्रमांक २९ मध्ये ८.२० टक्के मतदान

११.००: ठाण्यातील दिवा येथे मतदानाला थंड प्रतिसाद, दिवावासियांनी मतदानाकडे फिरवली पाठ

१०.५७: नाशिकमध्ये पहिल्या दोन तासांत ७.१५ टक्के मतदान

१०.५४:  उल्हासनगरमध्ये पाहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

१०.४१: नाशिकमध्ये ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू, पोलिसांचा चोख बंदोबस्त

१०.४०: नाशिकमधील नाशिकरोड, पंचवटी, सिडको, गंगापूर रोड अशा अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांची धावपळ; केंद्रांवरील बूथवर तथा ऑनलाईन पद्धतीने अॅप आणि वेबसाईटवर नावे दिसत नाहीत

१०.३८: नागपूरमध्ये १० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान

१०.३३:  नागपूरमधील ६३ आणि २० या बूथ क्रमांकावर विलंबाने मतदान सुरू, एमआयएमने आक्षेप नोंदवल्याने झाला विलंब

१०.२९: नागपूरमधील मोमीनपुरा मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचा गोषवारा नाही. जी. एस. महाविद्यालयालयासह अनेक केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने वृद्धांना त्रास

१०.२२: नागपुरात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क

१०.१७: ठाण्यातील किसन नगरमध्ये मतदार अनिल यादव यांच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान, मतदानासाठी केंद्रात गेले असता धक्कादायक प्रकार उघडकीस

१०.१० : अकोल्यात साडेनऊपर्यंत ६ टक्के मतदान

९.५९: उल्हासनगरमध्ये माजी महापौर आशा इदनानी यांच्या वाहनावर अज्ञातांनी केली दगडफेक

९.५०:  सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

९.४५: ठाण्यात पहिल्या दोन तासांत १०.३८ टक्के मतदान

९.४०: ठाण्यात मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लागल्या रांगा

९.३५: नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

९.२६: नागपूरमध्ये मतदान केंद्रावर यादीत नाव मिळत नसल्याने मतदार हैराण, इंटरनेट सेवा कोलमडल्याने उडाला गोंधळ

९.२२: नागपूर, ठाण्यासह सर्वत्र मतदारांचा उत्साह, केंद्रांबाहेर सकाळपासूनच रांगा

९.१३: ठाण्यातील नौपाडा परिसरात सुरक्षेसाठी पोलिसांकडून ड्रोनचा वापर

९.०८: सोलापूरमध्ये माजी आमदार नरसैया आडम यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

९.०३ : भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी ठाण्यात केले मतदान

८.५४ : नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांनी बजावला मतदानाचा हक्क

८.५२: नाशिकमध्ये केंद्रांबाहेर उमेदवाराच्या शिक्षणासह संपत्ती, गुन्ह्यांची माहिती देणारी यादी

८.४७: सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

८.४०: अकोला महापालिकेच्या ७३ जागांसाठी मतदान सुरू

८.३९: अमरावतीमध्ये ८७ जागांसाठी मतदान सुरू

८.३५ : ठाणे महापालिकेतील १३० जागांसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासूनच केंद्रांबाहेर रांगा

८.३१ : नागपूर, उल्हासनगरसह ठाण्यात मतदारांच्या केंद्रांबाहेर रांगा

८.२७: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदांसाठी मतदान सुरू, सकाळपासूनच मतदारांच्या केंद्रांबाहेर रांगा

८.१७:  नाशिकमधील मतदान केंद्रांवर सकाळी ७ पासूनच मतदारांच्या रांगा, उमेदवारांचे चारित्र्य, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाचूनच अनेक मतदार करतात मतदान

८.१५: राज्यातील तीन कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदार महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूक रिंगणातील तीन हजार २१० जागांसाठी रिंगणात असलेल्या १७ हजार ३३१ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार

८. ०८ : बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले मतदान

८.०५: राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू

७. ५८ : दोन लाख ७३ हजार ८५९ अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच मोठा पोलीस बंदोबस्त

७.४८ : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची व्यवस्था

७.४१ : मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्वत्र चोख बंदोबस्त

७.४० : नागपूर येथील भारत महिला विद्यालयातील केंद्रात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मतदान

७.३८ :  नागपूर येथील भारत महिला विद्यालयातील केंद्रात सरसंघचालक मोहन भागवत मतदानासाठी दाखल

७.३० : राज्यातील दहा महापालिकांसह जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरूवात