जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वादातून तालुक्यातील निमगाव येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी ४१ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर दंगल माजवल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

निमगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे जे. डी. हिरे विजयी झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी गावात मिरवणूक काढली. ही मिरवणूक राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार दीपक अहिरे यांच्या घरासमोरून जात असतांना दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यानंतर परस्परांच्या घरांवर दगडफेक व बाचाबाची यामुळे याठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी लाठ्या-काठ्या, दगड तसेच लोखंडी गजांचा वापर करण्यात आला. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमगावात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या दोन्ही गटातील लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

NCP Sharad Pawar group has filed its candidacy of Dhairyashil Mohite-Patil in Madha
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
in Chandrapur Clash Erupts Between NCP sharad pawar district president and BJP Workers Over Alcohol Issue
‘दारू’वरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले, चंद्रपुरात नेमके काय घडले? वाचा…

निमगावमधील हाणामारीत दोन्ही गटातील दहा जण जखमी झाले. जखमींना खाजगी रूग्णालयांत दाखल करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर निमगाव निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात शांतता प्रस्थापित करण्याच्या द्दष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निमगावला भेट दिली.