तालुक्यात वाळू माफियांनी पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. माण नदीवरील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांनी पोलीस हवालदार बाळासाहेब क्षीरसागर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. जखमी क्षीरसागर यांच्यावर पंढरपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तालुक्यातील मारापूर येथील अरुण यादव आणि १२ साथीदारांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री तालुक्यातील तनाळी येथे माण नदीच्या पात्रातील अवैधरित्या वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. शुक्रवारी वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडला आणि या बाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून बाळासाहेब क्षीरसागर आणि एक हवालदार घटनेच्या ठिकाणी जाऊन वाळूने भरलेला ट्रॅकटर ताब्यात घेवून पंढरपूरकडे येऊ लागले. वाटेत मारापूर येथे अरुण यादव आणि त्याच्या १२ साथीदारानी पोलीस हवालदार क्षीरसागर यांना अडवले आणि बाचाबाची केली. त्यानंतर या माफियांनी क्षीरसागर यांना धारदार शस्त्रांनी मारहाण केली. यामध्ये क्षीरसागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

chhatrapati sambhaji nagar police, hacking of EVM machine
ईव्हिएम यंत्र थांबवण्याचे तंत्र सांगणाऱ्याकडून अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, आरोपी ताब्यात
Kalyan, jeans making factories, Chinchpada, Dwarli area, kdmc, resident, pollution issue
कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त
Four people were died in an accident on Ralegaon-Kalamb road
वऱ्हाड्यांच्या बसला ट्रकची धडक, दोन सख्ख्या बहिणींसह चार ठार; राळेगाव-कळंब मार्गावरील घटना
Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी

या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तालुक्यातील मारापूर येथील अरुण यादव व त्याचे १२ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या हल्ल्याने वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून आता पोलिसाना देखील लक्ष्य केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर अशा वाळू माफियांवर कडक कारवाई करावी आशी मागणी नागरिकातून होत आहे.

वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणार : प्रभू

पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी पोलीस हवालदार याच्यावर केलेल्या हल्लेखोरावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणार आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. या पूर्वी असे हल्ले करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.या पुढेही अवैध वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभाग आणि पोलीस मिळून कारवाई सुरु ठेवणार असल्याचे सोलापूरचे पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.