विधान परिषदेच्या सभापतिपदावर रामराजे नाईक िनबाळकर यांची केवळ दोनच निकषांवर निवड झाली असावी असे वाटते. त्यापकी एक आहे ती प्रभूरामचंद्राने सगळी बुद्धिमत्ता त्यांना दिली असावी किंवा पायाने मुजरा करण्याच्या कलेला दाद देऊन शरद पवारांनी त्यांना सभापतिपद दिले असावे. खरे तर रामराजेंसारख्या व्यक्तीची हकालपट्टी करायला पाहिजे होती, असे परखड मत खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
गेले दोन दिवस रामराजे विरुद्ध भोसले असे वाग्युद्ध सुरू आहे. त्याचा नवा अध्याय खा. भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन लिहिला. रामराजे यांनी खा. भोसले यांच्यावर ‘छत्रपतींसारखे वागा, दारूपुरता त्यांचा पाण्याशी संबंध येतो तसेच किमान गटारे तरी बांधा’ असे शरसंधान श्रीराम सहकारी कारखान्याच्या निवडणूक प्रचारात केले होते. त्यावर खा. भोसले यांनी खरपूस समाचार घेत विधान परिषदेत रामराजेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडली जातील त्याला काय उत्तर देणार, असा प्रश्न विचारला.
खा. भोसले म्हणाले, जिल्ह्यात सभापतिपद आले त्याचा मला आनंद झाला होता. मात्र त्यांची निवड चुकीची होती. शिवाजीराव देशमुखांसारख्या संवेदनशील माणसाला रामराजेंसाठी काढण्यात आले. ते चुकीचे होते कारण रामराजे सत्तेसाठी, दिव्यासाठी हुजरेगिरी करतात. जिल्हाही विकण्यास, गहाण ठेवण्यास मागेपुढे पाहाणार नाही. मी निवडून आलो ते जनतेच्या प्रेमाने, माझ्या कामाच्या पोच पावतीने. या मंडळींनी ‘ई टेंडर’ पद्धतीने म्हणजे ‘ईव्हीएम’व्दारे निवडून दिले आहे. याचे प्रमुख कारण भ्रष्ट नेत्यांचे थडगे बांधण्यासाठी.गेली पंधरा वष्रे धरणे बांधली नाहीत, पण पसे वापरले गेले आहेत. माधवराव चितळे समितीचा अहवालही हे सांगतो आहे. यावर उत्तर देताना एकजण सांगतात, मी धरणात काय करू, तर रामराजे कायम सांगतात मी नीरादेवघर कोळून प्यालो आहे. आमचे म्हणणे हेच आहे. तुम्ही शिल्लक काही ठेवलेच नाही. अशी माणसे पक्षात ठेवल्यावर काय परिस्थिती होते हे अनुभवास आले आहे. त्यांना सभापतिपदावरून बरखास्त करता येते का त्याचा अजून पवार यांनी विचार करावा आणि हे केवळ माझे नाही तर राष्ट्रवादीतल्या अनेकांचे मत आहे असे ही खा. भोसले पुढे म्हणाले.