रितेश देशमुख लवकरच मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे हे तर सर्वांनाच माहित होते. पण हा चित्रपट कशावर असेल, या चित्रपटाचे नाव काय असेल याबाबत मात्र काहीच माहित नव्हते. आता मात्र या रहस्यावरुन पडदा उठला आहे. आता रितेशने या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. रितेश ‘फास्टर फेणे’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. या सिनेमात प्रमुख भूमिकेत अमेय वाघ पाहायला मिळणार आहे. तर क्षितीज पटवर्धनने या सिनेमाची कथा लिहीली आहे. ‘फास्टर फेणे’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी आदित्य सरपोतदार याने आपल्या खांद्यावर उचलली आहे.

जेनेलियाने या सिनेमाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने क्षितीज पटवर्धन, आदित्य सरपोतदार यांना एक छानस पत्र लिहून या सिनेमाचा एक भागा झाला असल्याने तुमचे मी आभार मानते. या सिनेमाच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. एवढेच लिहून ती थांबली नाही तर चॉकलेट्सचे गिफ्टदेखील या पत्रासोबत तिने पाठवले होते. जेनेलियाने पाठवलेल्या पत्रासाठी क्षितीजही सोशल मीडियावर तिचे आणि रितेशचे आभार मानायला विसरला नाही. आता या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला ‘फास्टर फेणे’ मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तेव्हाच समजेल या सिनेमासाठी रितेश-जेनेलिया आणि त्यांची संपूर्ण टीम घेत असलेली मेहनत किती यशस्वी होते ते…

Our new Marathi Film Production starts ‘Faster Fene’ @MumbaiFilmCompany ….

A photo posted by Riteish Deshmukh (@riteishd) on