फोटोशूट आणि चित्रपटांमधील विविध रूपांच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार्स चाहत्यांसमोर येत असतात. परंतु, आपला आवडता स्टार शाळेच्या गणवेशात कसा दिसायचा, हे तुम्हाला माहिती आहे का? पाहुयात काही बॉलिवूड स्टार्सचे शाळेच्या गणवेशातील फोटो.

02-priyanka-chopraप्रियांकाला अनेक ठिकाणच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकण्याचा योग आला. ज्यात लखनौमधील ‘ला मार्टिनिअर’ आणि बरैलीतील ‘सेंट मारिया गोरेटी कॉलेज’चा समावोश आहे. (फोटो- यू-ट्यूब)

03-madhuriप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘डिवाइन चाईल्ड स्कूल’मध्ये शिक्षण घेतलं आहे. (फोटो- यू-ट्यूब)

04-anushkaअनुष्का शर्मा लहानपणापासूनच दिसायला खूप गोड होती. तिने बंगळुरुच्या ‘आर्मी स्कूल’मध्ये शिक्षण घेतलं आहे. (फोटो- यू-ट्यूब)

05-deepika-padukoneबॉलिवूडनंतर हॉलिवूड गाजविणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने बंगळुरूमधील ‘सोफिया हायस्कूल’ आणि ‘माऊंट कारमेल कॉलेज’मध्ये शिक्षण घेतलं आहे. (फोटो- यू-ट्यूब)

06-ranbir-kapoorरणबीर कपूरने ‘बॉम्बे स्कॉटिश स्कूल’मध्ये शिक्षण घेतलं आहे. (फोटो- यू-ट्यूब)

07-ranveer-singhबॉलिवूडचा खट्याळ अभिनेता रणवीर सिंगने ‘एच. आर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स’मधून शिक्षण घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला होता. (फोटो- यू-ट्यूब)

08-salman-khanसुपरस्टार आणि बॉलिवूडमधील ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे शिक्षण ग्वालिअरच्या ‘सिंधया स्कूल’ आणि मुंबईतील ‘सेंट स्टेनिस्लस हायस्कूल’मध्ये झालं आहे. (फोटो- यू-ट्यूब)

09-katrina-kaifअभिनेत्री कतरिना कैफचे शिक्षण अनेक शिक्षण संस्थांमधून झालं आहे. काही काळासाठी तिने घरातून अभ्यास करून परीक्षा दिली आहे. (फोटो- यू-ट्यूब)