रुबिना दिलैक की लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक राहिली आहे. रुबिनाने पाच वर्षांपूर्वी अभिनव शुक्लाशी लग्न केलं, ती व अभिनव २०२३ मध्ये पालक झाले आणि त्यांनी आपल्या जुळ्या मुलींचं स्वागत केलं. अभिनवशी लग्न करण्याआधी रुबिना अभिनेता अविनाश सचदेवबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. ‘छोटी बहू’ मालिकेत एकत्र काम करतांना त्यांचा एकमेकांवर जीव जडला, मग जवळपास चार वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. नंतर काही कारणांनी ते वेगळे झाले.
अविनाश सचदेवने एक्स गर्लफ्रेंड रुबिनाबद्दल काय म्हटलं?
नुकत्याच एका मुलाखतीत अविनाश सचदेवने त्याची एक्स गर्लफ्रेंड रुबिना दिलैकबद्दल विधान केलं होतं. रुबिना एक पझेसिव्ह आणि असुरक्षित गर्लफ्रेंड होती, असं अविनाश म्हणाला होता. यावर रुबिनाचा पती अभिनव शुक्लाला प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी अभिनवने अविनाशवर टीका केली. “जे आता डेटिंग करत आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ज्यांना आपलं आयुष्य खराब करायचं नाही, अशा खूप साऱ्या तरुणांना माझा एक सल्ला आहे की जेव्हा एखादं नातं संपतं तेव्हा ते पूर्णपणे संपतं.” ब्रेकअपनंतर तुम्ही मित्र राहू शकत नाही, असं अभिनवने म्हटलंय.
अभिनवने अविनाशच्या वक्तव्याचा घेतला समाचार
अविनाशला रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने चांगलंच सुनावलं. “माणूस व्हा, त्या मुलीबद्दल बोलू नका, भूतकाळातील कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही बोलू नका, कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. जे संपलंय ते संपलंय. आमचं ब्रेकअप झालं आहे पण आम्ही अजूनही मित्र आहोत, असं लोक बोलतात पण हे हॉलीवूडमधून आलं आहे. ब्रेकअपनंतर तुम्ही मित्र राहू शकत नाही. कारण ज्या व्यक्तीशी तुमचे भावनिक संबंध होते, त्या व्यक्तीशी तुमचं असलेलं नातं तुटलं असेल तर तुम्ही त्यांचे मित्र बनून राहू शकत नाही. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर इतर गोष्टीही तिथेच संपवा,” असं अभिनव शुक्ला म्हणाला.
जुळ्या मुलींचे आई-बाबा आहेत रुबिना-अभिनव
काही वर्षे डेट केल्यानंतर अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक यांनी २१ जून २०१८ रोजी लग्न केलं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी ते गेल्या वर्षी २७ नोव्हेंबर रोजी दोघेही आई- बाबा झाले. त्यांना जुळ्या मुली असून त्यांची नावं जीवा व इधा आहेत. अविनाश व रुबिना सध्या त्यांचं पालकत्व एंजॉय करत आहेत. ते आपल्या मुलींबरोबर वेळ घालवत आहेत.