आठ निवडक एकांकि कांमध्ये १७ ऑक्टोबरला  अंतिम सामना ल्ल नाटककार महेश एलकुंचवार यांची उपस्थिती

आठ शहरांमधून तरूणाईच्या कल्पक नाटय़ाविष्काराशी जोडली गेलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. मुंबईच्या ‘एक्सप्रीमेंट’ पासून नागपूरच्या ‘विश्वनटी’ पर्यंत विविधांगी विचार मांडणाऱ्या आठ शहरांच्या आठ एकांकिका आता अंतिम सामन्यासाठी समोरासमोर येणार असून यंदा ‘लोकांकिका’चा बहुमान कोणत्या शहरातले कोणते महाविद्यालय पटकावणार?, या एकाच प्रश्नाने राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरूणाईची उत्कंठा वाढवली आहे.

lokmanas
लोकमानस: सहकाराखालोखाल राजकारणाचा अड्डा
ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम प्रयोग शनिवारी, १७ ऑक्टोबरला प्रभादेवी येथील रविंद्र नाटय़मंदिरात रंगणार आहे. राज्यभरातून प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी अशा चाळणीतून कडी मेहनत आणि तगडी स्पर्धा देऊन महाअंतिम फे रीपर्यंत धडक मारलेल्या या भावी नाटककारांना अभ्यासू आणि मनस्वी नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडून कौतूकाची थाप मिळणार आहे. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगान्त’ सारखी सरस आणि वेगळ्या पठडीतील नाटक देणारे नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडून अगदीच नवख्या विचारांच्या, जोशाने आपले विचार एकांकिकांमधून मांडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच भेटीत नाटय़ाविष्काराचे नवे धडे गिरवायला मिळणार आहेत. याशिवाय, मराठी चित्रपट-नाटय़ वर्तुळातील अनेक नामांकित चेहरे या महाअंतिम फे रीसाठी उपस्थित राहणार आहेत.

१३३ एकांकिकांशी लढत देऊन या आठ एकांकिका महाअंतिम फे रीपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्यावर्षी ‘लोकांकिका’चा बहुमान पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाने ‘चिठ्ठी’ या एकांकिकेसाठी पटकावला होता. पुण्यासह रत्नागिरी आणि मुंबईच्या महाविद्यालयानी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. ‘लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वात हा बहुमान पुन्हा पुण्याकडे जाणार?, मुंबईला मिळणार की औरंगाबादपासून रत्नागिरीपर्यंतचे नवे शिलेदार यावर आपले नाव कोरणार, याचे उत्तर महाअंतिम फेरीतच मिळेल. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ची महाअंतिम फेरी अनुभवण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध असतील. या स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभले आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या कार्यक्रमाचे टॅलेण्ट पार्टनर तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.

महाअंतिम फेरीतील एकांकिका

ठाणे : ज्ञानसाधनाची ‘मित्तर’

नाशिक : ‘व्हॉट्स अ‍ॅप’ केटीएचएम महाविद्यालय

मुंबई : ‘एक्सप्रीमेंट’ म. ल. डहाणूकर महाविद्यालय

पुणे : ‘जार ऑफ एल्पिस’

नागपूर : ‘विश्वनटी’ विठ्ठलराव खोब्रागडे कला-वाणिज्य महाविद्यालय

औरंगाबाद : ‘भक्षक’ मराठवाडा विद्यापीठ नृत्यविभाग

नगर : ‘ड्रायव्हर’ पेमराज सारडा महाविद्यालय

रत्नागिरी : ‘महा भोग’ गोगटे जोगळेकर महाविद्यालय