पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची तरतूद म्हणून आपण बचत करतो, गुंतवणूक करतो. आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच.

शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ‘‘शेअर बाजारात पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत.
शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. वर्तमानपत्रे, इंटरनेटवरील साइट्स, शेअरबाजाराविषयी माहिती देणारे चॅनेल्स याद्वारे बरीच माहिती मिळू शकते. ऑनलाइन ट्रेिडग करण्यासाठी http://content.icicidirect.com, http://www.sharekhan.com सारख्या लोकप्रिय आणि विश्वसनीय साइट उपलब्ध आहेत.
शेअरबाजार आणि ऑनलाइन ट्रेिडग याबद्दलचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्हच्र्युअल ट्रेिडग. http://virtualstocks.icicidirect.com/ ¹FF साइटवर तुम्ही व्हच्र्युअल मनी म्हणजेच खोटे पसे वापरून शेअर्सची खोटी खोटी खरेदी-विक्री करू शकता. येथे तुम्ही इरए आणि ठरए वर खरेदी-विक्रीची ऑर्डर देऊ शकता. श््र१३४ं’ २३ू‘ वर खऱ्या लाइव्ह मार्केटप्रमाणे कोणतीही जोखीम नसते. त्यामुळे तुम्ही येथे वेगवेगळे प्रयोग करून बघू शकता आणि तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
Virtual stock हा ऑनलाइन ट्रेिडग करण्यासाठी बनवलेला एक खेळ आहे. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. तुमचे अकाऊंट तयार झाल्यावर ट्रेिडग करण्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये देऊ केलेले असतात. बाजारभावाप्रमाणे शेअर्सची खरेदी-विक्री करून आपल्याला नफा मिळवता येतो का ते या खेळाद्वारे पाहता येते. तुम्हाला नफा झाल्यास तो नफा तुमच्या ताब्यातील (खोटय़ा खोटय़ा) रकमेत समाविष्ट केला जातो आणि तोटा झाल्यास ती रक्कम कापून घेतली जाते.
तसेच शेअर बाजाराच्या वेळेत म्हणजेच सकाळी 9.15 ते 3.30 ह्या वेळेतच हे व्यवहार करू शकता. या साइटवर काही विशिष्ट कंपन्यांच्याच शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. त्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत लाइव्ह मार्केटनुसार वर-खाली होताना दिसते. मार्केटनुसार तुम्ही तयार केलेल्या पोर्टफोलिओच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे परीक्षण तुम्हाला करता येते. तुम्हाला या खेळाद्वारे सराव करून कौशल्य प्राप्त करता येते. खरे व्यवहार करताना नवखेपणा कमी होऊन होणाऱ्या चुका प्रत्यक्ष व्यवहारात टाळता येतील.
या साइटवर रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे, पोर्टफोलिओ कसा बघायचा, हे सर्व व्हिडीओरूपात उपलब्ध आहे. FAQ मधे virtual stock बद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना साइटवरील विविध िलक्स cash buy/sell, margin buy/sell इत्यादींची माहिती दिलेली आहे.
http://www.nse-india.com/NP/nse_paathshaala.htm आणि http://moneybhai.moneycontrol.com/ या अशाच प्रकारच्या व्हच्र्युअल ट्रेिडगच्या साइट्स आहेत. या साइट्सवरदेखील अकाऊंट उघडण्याच्या संदर्भातील माहिती आणि व्हच्र्युअल ट्रेिडग करण्याची नियमावली तसेच व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ उपलब्ध आहेत.
मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

india sebi advises regulators to supervise cryptocurrency trading
‘क्रिप्टो’ व्यवहारांवर नियंत्रणासाठी सेबी अनुकूल; रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा
parents advice on career goal
चौकट मोडताना : ठेच खाऊन आलेले शहाणपण
Maternity leave
पहिल्या दोन लग्नांपासून महिलेला दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा मिळेल का? उच्च न्यायालयानं केली महत्त्वपूर्ण टिप्पणी!
Redevelopment of old buildings issues
पुनर्विकासाचे धडे : काय काय घेऊन जाणार?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता