चांगली बॅटरीक्षमता हेच सामथ्र्य लिनोवोने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला, त्या वेळेस फारसे कुणाचे त्याकडे लक्ष गेले नाही. केवळ जाणवणारा भाग एकच होता की, सॅमसंग ज्या तांत्रिक गोष्टी १८-१९ हजारांत देत होते, त्याच बाबी लिनोवोने त्यांच्या स्मार्टफोनमध्ये केवळ १२-१३ हजारांत देण्यात सुरुवात केली होती. तत्पूर्वी लॅपटॉपच्या बाजारपेठेत लिनोवोने चांगले नाव कमावले होते, त्याचा फायदा त्यांना स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेत उतरताना झाला. त्यानंतर आलेल्या कॉिलग टॅब्लेटने सॅमसंगलाही स्पर्धा निर्माण केली. आता हा ब्रॅण्ड रास्त किमतीतील स्मार्टफोनमध्ये पूर्णपणे स्थिरावण्याच्या बेतात आहे.
स्मार्ट डिझाइन, उत्तम कॅमेरा आणि चांगली बॅटरी हे लिनोवोच्या मॉडेल्सचे विशेष आहेत. बाजारात नव्याने आलेल्या एस८६० या मॉडेलमध्येही हे विशेष पाहायला मिळतात. तब्बल ४००० एमएएच बॅटरी हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. अलीकडे थ्रीजीचा वापर वाढल्यामुळे बॅटरी लवकर खर्ची पडते, असा अनुभव आहे. त्यातही व्हॉटस्अप किंवा हाइकसारखी मेसेंजर सव्‍‌र्हिस अधिक बॅटरीखाऊ असते. त्यामुळेच अलीकडचे स्मार्टफोनचे वापरकत्रे सक्षम बॅटरीच्या शोधात असतात. काळ्या-करडय़ा रंगाची अ‍ॅल्युमिनिअम बॉडी आणि समोरच्या बाजूस ५.३ इंचांचा मोठय़ा आकाराचा डिस्प्ले असे याचे रूपडे आहे.
बॅटरी आतमधल्या बाजूस असून ती बाहेर काढण्याची सोय नाही. त्यासाठी सपोर्ट सेंटरमध्येच जावे लागेल. वरच्या बाजूस हेडफोन जॅक आहे. उजवीकडे वरच्या बाजूस आवाज कमी-अधिक करण्याची सोय आणि त्याखाली ऑन-ऑफ बटण आहे. डावीकडे सिम स्लॉट असून खालच्या बाजूस दोन स्पीकर्स आहेत, तर मधोमध मायक्रो यूएसबी स्लॉट आहे. अलीकडे स्मार्ट मोबाइल असे म्हटले की, कमी वजनाचा आणि हलका असे त्याचे स्वरूप अपेक्षित असते. मात्र लिनोवो एस८६०चे वजन तब्बल १९० ग्रॅम्सचे आहे. मात्र अर्थात त्यामुळे त्याच्या देखणेपणात कोणतीही बाधा येत नाही.

मेमरी कार्डची सोय नाही
त्यात एक्स्टर्नल मेमरी कार्डाची सोय नाही, केवळ इंटर्नल मेमरी असून ती मात्र १६ जीबीची देण्यात आली आहे. सध्याच्या जमान्यात १६ जीबी मेमरी म्हणजे काहीच नाही, अशी अवस्था आहे,  हे लक्षात घेऊनच लिनोवोने क्लाऊडची सोय या मोबाइलसोबत उपलब्ध करून दिली असून ती अमर्याद स्वरूपाची आहे. त्यामुळे तुम्हाला कार्डवर अवलंबून राहण्याची गरज नाही. फक्त क्लाऊड सíव्हस वापरताना तुमचा डेटा पॅक वापरावा लागेल एवढेच. कदाचित भारतासारख्या देशात हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा ठरू शकतो.
लिनोवोच्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.३ इंचांचा आणि ७२०x१२८० रिझोल्यूशन पिक्सेल्सचा आहे. त्यामुळे दृश्य पाहताना फारसा फरक पडत नसला तरी यापेक्षा चांगले पिक्सेल्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. परस्परविरोधी रंगसंगती पाहताना मात्र दृश्यरूपात काहीसा फरक जाणवतो.

जेली बीन
या स्मार्टफोनसाठी १.३ कोर्टेक्स- ए- सेव्हन चिपसेट क्वाडकोअर मीडिआटेक प्रोसेसर वापरण्यात आला असून तब्बल २ जीबी रॅम वापरण्यात आले आहे. त्यामुळे फोन वापरताना फारसा त्रास पडत नाही. सध्या तरी यामध्ये ४.२ ही अँड्रॉइडची जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीम लोड करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अपग्रेडची सोय असून फोन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्ही ४.४ ही अँड्रॉइडची नवी आवृत्ती डाऊनलोड करू शकता. या नव्या आवृत्तीमध्येही हा फोन चांगल्या प्रकारे काम करतो, असे लक्षात आले. लिनोवोने अँड्रॉइडमध्येच त्यांचा यूजर इंटरफेस मात्र स्वत:ला हवा तसा कस्टमाइज्ड करून घेतला आहे. पॉवर मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी यूजर इंटरफेसमध्ये काही बदल केले आहेत. काही गोष्टी एकाच प्रकारच्या एका वेगळ्या फोल्डरमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या गोष्टी एकत्र, गुगल अ‍ॅप्स एकत्र असे सारे पाहायला मिळते.

कॅमेरा
समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा १.६ मेगापिक्सेल क्षमतेचा आणि तेवढा चांगला नसला तरी मागच्या बाजूस असलेला कॅमेरा हा ८ मेगापिक्सेलचा आणि चांगला आहे. सोबत एलईडी फ्लॅशही दिलेला आहे. बाहेर सूर्यप्रकाशात फोटो नेहमीच चांगले येतात आणि कमी प्रकाशात छायाचित्रे तेवढी चांगली येत नाहीत, अशा जवळपास सर्वच स्मार्टफोनचा अनुभव असतो. तसाच अनुभव या फोनच्या बाबतीतही येतो. मात्र या फोनमध्ये देण्यात आलेला आयएसओ वापरण्याचा पर्याय निवडून त्यावर चांगल्या पद्धतीने मात करता येते, असे रिव्ह्य़ूदरम्यान लक्षात आले. अलीकडे सर्वच कॅमेरा अ‍ॅपमध्ये स्मार्ट सेटिंग्ज दिली जातात, तशी ती या मॉडेलमध्येही आहेत. त्यात मॅक्रो, पॅनोरमा, पीआयपी, इव्ही ब्रॅकेट, फेस ब्युटी मोडस् या पर्यायांचा समावेश आहे.

जबरदस्त बॅटरी
स्मार्टफोनचे सर्वात मोठे असे शक्तिस्थळ म्हणजे त्याची बॅटरी. ती तब्बल ४००० एमएएच क्षमतेची आहे. केवळ बॅटरीची अधिक क्षमता एवढेच तिचे वैशिष्टय़ नाही तर तिचा वापर करून तुम्ही इतर डिव्हायसेसही चार्ज करू शकता म्हणजेच पोर्टेबल चार्जर म्हणूनही या स्मार्टफोनचा वापर करता येऊ शकतो.
 बाजारात हा स्मार्टफोन १८ हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. एवढी चांगली बॅटरी क्षमता इतर कोणताही स्मार्टफोन या किमतीत देत नाही. शिवाय उपकरण म्हणून त्याचे असलेले क्वाड कोअर प्रोसेसर, २ जीबी रॅम हे पॅकेजही चांगले आहे. कॅमेराही उत्तम आहे. शिवाय तो डय़ुएल सिम आहे. त्यासाठी मायक्रो सिम वापरावे लागते. रास्त दरात एक चांगला फोन म्हणून हा पर्याय लक्षात ठेवायला हरकत नाही