आपले घर हे आता पूर्वी सारखे केवळ साधे घर राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांत तेही इलेक्ट्रॉनिक घर झाले आहे. आणि आता तर ते स्मार्ट होते आहे. आपल्या हाती असलेली सर्वच उपकरणे स्मार्ट होत आहेत. गेल्या दोन वर्षांत मोबाईल सारखेच आणखी एक सर्वाधिक स्मार्ट झालेले उपकरण म्हणजे आपल्या घरातील टीव्ही. प्रथम प्लाझ्मा मग एलसीडी असे करत आता त्याचा डिस्प्ले एसइडी झाला आहे. त्याचे आयुष्यमान तर चांगले आहेच पण त्याची प्रकाशमानताही तेवढीच चांगली आहे. त्यामुळे दृश्यात्मकतेमध्ये खूप चांगला फरक पडलेला दिसतो.
दृश्यात्मकतेमधील हा चांगला फरक घेऊन आता एओसी या कंपनीने एओसी एलइ ३०ए३३३० हे मॉडेल बाजारात आणले आहे. हा २९ इंची टीव्ही असून तो अतिशय सडपातळ आहे. त्यामुळे तुमच्या घरातील िभतीवर तो देखणा दिसू शकतो. यात रीअल कलर इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यातआला आहे. त्यामुळे दृश्य सुसुस्पष्ट तर दिसतेच पण त्यात जिवंतपणाचा भासही होतो. हा स्मार्ट टीव्ही असल्याने त्याला स्वतंत्रपणे यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे यूएसबी जोडून तुम्ही चित्रपट, छायाचित्र किंवा संगीताचाही  आस्वाद घेऊ शकता. याला एचडीएमआय पोर्ट देण्यात आला  आहे. त्यामुळे त्या मार्फत इतर उपकरणाचीं जोडणी करून हाय- डेफिनेशन बाबींचा अनुभवही घेता येईल. या टीव्ही सोब्ऋत कंपनीची तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २२,४९०/-