कास पठार – सज्जनगड
पावसाळा सुरू झाला की, अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २ आणि ३ ऑक्टोबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

तैलबैला-घनगड मोहीम
‘एसपीआर’तर्फे येत्या १३ सप्टेंबर रोजी तैलबैला-घनगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकणदिवा पदभ्रमण
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या ६ सप्टेंबर रोजी कोकणदिवा येथे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

देवरीताल ट्रेक
उत्तराखंडमधील गढवाल भाग म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. बर्फाच्छादित पर्वत, खोल वाहत्या नद्या, सूचीपर्णी वृक्षांचे जंगल, दऱ्याखोऱ्यातील गावे आणि विविध रंगात न्हाहून निघणारे आकाश या साऱ्यांमुळे इथला निसर्ग प्रेमात पाडत असतो. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २६ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान या भागात ‘देवरीताल चंद्रशिला’ या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेदरम्यान हिमालयाचे सुंदर दर्शन घडते. नंदादेवी, त्रिशूल, केदार आणि चौखंबा अशी हिमशिखरे दिसतात. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

शिवनेरी, नाणेघाट अभ्यास सहल
‘होरायझन’तर्फे येत्या १३ सप्टेंबर रोजी शिवनेरी आणि नाणेघाट या ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल सफारी
‘गाको टूर्स’तर्फे १८ ते २० डिसेंबर दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी निखील भोपळे (९८१९३३०२२२) यांच्याशी संपर्क साधावा.